गुन्हा हा जन्मताच नसून तो अपघातामुळे घडतो -दयानंद पाटील

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

आजच्या या आधुनिक युगामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जे काय फोटोज फॉरवर्ड करतो ते जर फोटो चुकीचे असल्यास तो गुन्हा ठरू शकतो. गुन्हा हा जन्मताच नसून तो अपघातामुळे घडत असतो म्हणून युवक युवतीने आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण आपले आयुष्य हे पुस्तकी ज्ञान संपादन करण्यात घालवावा. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे किशोरवयीन विद्यार्थ्यावर त्याचे वाईट परिणाम होत आहेत. म्हणून जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या युनेस्को या संस्थेने इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. दयानंद पाटील यांनी युवक युवती व पालक मेळावा कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी आपले मत व्यक्त केले. देवणी तालुक्यातील धनेगाव येथील श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धनेगाव येथे विशाखा समिती श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धनेगाव व अनुभव शिक्षा केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवशीय युवक युवती व पालक मेळावा कार्यशाळा संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रामलिंग मुळे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भरोसा सेल आणि दामिनी पथकाचे प्रमुख दयानंद पाटील ,टाइम्स नाऊ मराठी चैनलचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत पाटील, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, अनुभव शिक्षा केंद्र विभाग प्रमुख दीपक देवरे, सरस्वती शिंदे ,जिल्हा समन्वयक महादेव कोठे अँड. सुजाता माने , वरुणराज सुर्यवंशी, दामिनी पथकाच्या सदस्या देवमाने, ढगे, चिखलीकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामलिंग मुळे यांनी केले. सूत्रसंचालन महाजन बी.सी. यांनी केले. तर आभार सरस्वती शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रामलिंग मुळे यांनी अध्यक्षीय समारोप केले.या कार्यक्रमाला धनेगावचे पोलीस पाटील बंकटराव बोयणे, उमाकांत बोयणे, वसंत बिबीनवरे ,दैनिक चालू वार्ताचे प्रतिनिधी इस्माईल शेख, प्रसाद चव्हाण, विक्रम गायकवाड, पवार शेटीबा तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, सुजान पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp