गुरनाळ साठवण तलावावरून मोटारींची चोरी
देवणी प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील गुरनाळ येथील साठवण तलावावरून दि 23रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरांनी 11 शेतकऱ्यांच्या तळयावरील मोटारी चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की गुरनाळ साठवण तलावावरून आकरा शेतकऱ्यांच्या मोटारी अंधाराचा व पावसाचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी मोटारी चोरून नेल्याची घटना घडली.घटना घडल्याचे लक्षात आल्यानंतर तुकाराम नामदेव माने यांनी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या सदरच्या चोरी प्रकरणामुळे गावात भिती निर्माण झाली आहे. व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे या चोरीच्या प्रकरणामुळे पोलिसांपुढे एक आव्हान निर्माण झाले आहे या मोटारीच्या शोधाच्या कामांमध्ये पोलिसांनी चोरांनी घेऊन गेलेले वाहन सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे किंवा नाही हे जर मिळाले तर त्याचा शोध लागणे सोपे जाईल अशी चर्चा गावामध्ये चालू आहे कारण हे वाहन देवणी ला जर गेले असेल तर फुटेज मध्ये सापडण्याची शक्यता आहे. चोरटे जर वाहन घेऊन देवणीच्या दिशेने आले असतील तर चोरटे सापडण्यास मदत होईल .प्राप्त दिलेल्या तक्रारीनुसार जवळपास लाखाचे नुकसान झालेले आहे.
चोरी गेलेल्या मोटारींचे शेतकरी अर्जदार तुकाराम माने रब्बानी शेख अंकुश बागवाले वामन माने नफीसापी सय्यद धोंडीबा बागवाले मुस्तफा शेख चंद्रकांत हसनाळे रामदास हसनाळे अनुसया बोरोळे व्यंकट माने यांचा समावेश आहे. तक्रारदारांनी सदरील घटनेची चौकशी करण्यात यावी म्हणून सदरचे निवेदन पोलीस ठाण्यात दिलेली आहे.
पोलिसांनी सदरील घटनेची नोंद करूनआज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.