गुरू पोर्णिमा निमित्ताने पत्रकार कोयले प्रताप यांचे सत्कार
देवणी :-
तालुक्यातील बोरोळ येथे दिं. 21 जुलै 2024 रोजी गुरू पोर्णिमा निमित्ताने अंगद भोसले मित्र परिवारा मार्फत पत्रकार प्रताप कोयले यांचा शाल, श्रीफळ आणि हार घालून सत्कार करण्यात आले.
गुरू पोर्णिमा निमित्ताने बोलताना सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न शिल रहावे असे आवाहन अंगद भोसले मित्र परिवारांचे अध्यक्ष अंगद भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.हा सत्कार सर्व पत्रकार प्रतिनिधित्व स्वरूपात माझा सत्कार करुन आशा व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमास अंगद भोसले मित्र परिवारांचे सदस्य तथा प्रतिष्ठित नागरिक नरहारी भोसले, व्यंकटराव जाधव, तुकाराम सावरे, विनोद खरात, पांडुरंग कोयले, उद्धव देवणे, विष्णू भोसले आणि जिवण खरात सह अदिंची उपस्थिती होती.