गुळाच्या चहाच्या नावाखाली सध्या चहा पिणाऱ्या नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे .वास्तविक पाहता गुळाच्या चहाच्या हॉटेलमध्ये कोठेही तुम्हाला गुळ पाहायला भेटणार नाही पण गुळाचा चहा म्हणून खुल्लम खुल्ला नागरिकाच्या डोळ्यात धुळफेक करून गुळाचा चहा म्हणून विक्री केली जात आहे .हॉटेल वाल्याजवळ गुळ नसतो पण एक मसाल्याचे पाकीट असते आणि त्याला गुळाची टेस्ट असल्यासारखी वाटते . त्यापासून चहा बनवून गुळाचा चहा म्हणून खुल्लम खुल्ला विक्री केली जाते .गुळाचा चहा पिणाऱ्या नागरिकांनी त्या हॉटेल विक्रेत्याला तुम्ही आमच्या समोर गुळ टाकून चहा करून द्या म्हणून विनंती करून ! पहा तो तुमची विनंती स्वीकारणार नाही .पण गुळाच्या चहाच्या नावाखाली मात्र चहा पिणारा नागरिकांची फसवणूक होत असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे ( तुर्त इतकेच )डॉ .आंबेजो
गाईकर अग्निबाण लाईव्ह न्युज चॅनल उमरखेड 9763697824