गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना अद्याप भेटले नाही.

देवणी / प्रतिनिधी (रणदिवे लक्ष्मण)

देवणी /प्रतिनिधी : तालुक्यातील शेतकरी अपघात विमा २०२० ,२०२१ शेतकरी मयत होऊनही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अद्यापपर्यंत लागू झालेला नाही ,मयतचे वारसदार कृषी कार्यालय देवणी येथे सतत चौकशी करता,
विभागाशी वारंवार जाऊन ही योजना अद्याप भेटली नाही, परंतु शासन दरबारी न्यायचं आहे किंवा नाही ते कळत नाही ,म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमाच्या संदर्भात पत्रकार प्रतिनिधी जाऊन चर्चा केली असून या विभागातील कर्मचारी सूर्यवंशी व्ही,व्ही, यांच्याकडे गोपीनाथ मुंडे विभाग यांच्याकडे आहे परंतु मयताच्या वारसांना सर्व कागदपत्राची पूर्तता करून ही गेले एक वर्ष होत असून याकडे कुणीही लक्ष देत नाही ते आमचं काम नाही यावरून काम जिल्हास्तरावरून चालतेय असे बोलले जात आहे तरी देवणी तालुक्यात गोपीनाथ मुंडे विमा अपघात योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय कोण देणार असा मोठा प्रश्न पडला आहे ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व वहीतील धारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहीतील धारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एक सदस्य आई वडील शेतकऱ्यांची पती पत्नी मुलगा व विवाहित मुलगी या पैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वयोगटातील एकूण अपघात विमा संरक्षण शेतकरी आणि एक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आशानाच योजनेचा लाभ घेता येतो परंतु या योजनेच्या देवणीतालुक्यातील लाभ भेटलेला नाही तरी या गोपीनाथ मुंडे अपघात विमा च्या लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्यात यावा अन्यथा @मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्यावतीने वारसदार यांनी संघटनेकडे आपले प्रश्न मांडले आहे त्वरित प्रश्न नाही सोडवले तर आम्ही लढा उभारावे लागेल अशा इशारा देण्यात आला आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp