देवणी / प्रतिनिधी : पात्र लाभार्थ्यांना ताबा मागणी नुसार घर जागेचा त्वरीत ताबा दया! त्वरीत ताबा दया!! त्वरीत ताबा दया!!! विषय: सन साल १९९० ते २०१४, २०१४ ते २०१७, २०१७ ते २०२२ च्या कालावधीत बेघर घरजागेच्या मागणीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना व तहसिल प्रशासनाने दि. २९/०२/२०१७ रोजी १ ते ८७ घर पात्र लाभाथ्र्यांना लॉट पध्दतीने ८७ लाभार्थ्यांना प्लॉटचे वाटप केलेल्यांनाच पात्र ८७च्या यादीस महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने मान्यता देवून तात्काळ प्लॉट/ जमीन हस्तांतर करण्याचे आदेशीत केल्यावरुन व मुख्याधिकारी न.पं. यांच्या स्तरावरुन तात्काळ घर / जागेचा जावा जमीन हस्तांतरीत करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेशाने पालन करून ८७ पात्र लाभार्थ्यांना तात्काळ ताबा दिला गेला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र विविध आंदोलने करीत असले बाबत.
मानवी हक्क आयोगाची ऑर्डर / निकाल होवुन पाच महिने उलटून गेली आहेत. नगर पंचायत कार्यालयाकडे संघटनेच्या वतीने मा.हक्क आयोगाच्या आदेशाची प्रत दि. २८/११/२०२२ रोजी दाखल करून पर जागेचा/प्लॉटचा ताबा मागणी करून करून एक महिना उलटून गेला आहे.
परंतु आपल्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई झालेली नसून उलट बेघरांच्या मुलभुत हक्काचे हनन व पायमल्ली होवुन व महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांच्या आदेशाचे अमलबजावणी केल्याचे दिसून आलेले नाही. उलट आदेशाची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत
आहे.
अन्यथा हे निवेदनपुर्व सुचना व कल्पना म्हणून समजून उमजून घेण्यात यावे. यापुढे कोणत्याही वेळी, कोणत्याही प्रसंगी आपल्या कार्यालयासमोर पात्र लाभार्थी बेघर व त्यांचे कुटुंबिय व इतर सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते सर्वसामान्य लोकांच्या प्रचंड सहभागाने आक्रोश प्रचंड डंका मोचनि येवुन आपल्या कार्यालयासमोर घर जागेचा ताबा मिळेपर्यंत, जमिन हस्तांतर होवुन मुळ कागदपत्र नावाने करून मिळेपर्यंत बेमुदत सत्यागृह, निदर्शने, आत्मदहन, उपोषण अशा प्रकारचे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जातील. याची कृपया आपण स्वतः व कार्यालयाने नोंद घ्यावे आसे सामाजिक संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

