@घोणसी गावच्या बेघर लोकांनी केली गावठाण विस्ताराची मागणी
आल्पवयीन मुलीवर झालेल्या आत्याचाराचा हि केला निषेध.
@श्रमीक व एकल महिला संघटनेच्या शंभर महिला कार्यकर्त्या च्या उपस्थीतीने दिले निवेदन.
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
जळकोट तालुक्यातील घोणसी च्या बेघर लोकांनी केले गावठाण विस्ताराची मागणी व अल्पवयीन मुलीवर केज मध्ये झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करून दिले अरविंद घाटे यांना दिले निवेदन दि.८/५/२०२३ रोजी लातुर जिल्हयातील जळकोट येथे श्रमीक क्रांती आभियान व एकल महिला संघटनेच्या शंभर महिला कार्यकर्त्यानी तहसील कार्यलयात उपस्थीत राहुन निवेदन दिले आहे घोणसी येथे बेघर आसल्याचा लोकांचा प्रश्न आसुन १८/४/२०२३ रोजी ग्रा.प.घोणसी यांनी लोकाच्या मागणीवरुन व संघटनेने त्यांची बाजु मांडुन मागणी लावुन धरल्या कारणे ग्रामसभेत ठराव पारित करुन २११ लोकांचा गावठाण विस्तार आतर्गत जागे मिळणे बाबद प्रस्ताव दाखल दि १८/४/२०२२रोजी दाखल केले आहे,कोरोना काळात याचा पाठपुरावा करता आला नसल्याने जैसे थे स्थीतीत आहे यापुढील कार्यवाही होऊन जागे मिळावेत आसी मागणी उपस्थीत महिलांनी केली.तसेच
केज ता.येथे आल्पवयीन मुलगी वर्षा आमटे हिच्यावर आत्याचार करुन खुन केले प्रकरणी या घटनेचा निषेध करुन न्यायाची ही मागणी करण्यात आली आहे, यवतमाळ जिल्हयातील उसतोड कामगाराची गरीब कुटुंबातील १६ वर्षाची मुलगी हिचेवर उसतोड मुकादम नामे सुशील बांगे याने दि..५ मे रोजी बलात्कार केला व तिच्या डोक्यावर लोखंडी रॉड ने वार केले व गळा दाबुन तिची निर्घृण हत्या केली या प्रकरणी १) या गुन्हेगारावर आत्याचार प्रतिबंध कायद्यान्वे व बाल लैगिंक आत्याचार प्रतिबंध कायद्यान्वे गुन्हा नोंद करण्यात यावे.२) सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे ३)या मजुर कुंटुबियाना परराज्यात स्थालतरीत होण्यास भाग पाडल्या बद्द्ल मानव तस्करी प्रतिबंध कायद्याच्या व बळजबरीने कामास लावले प्रकरणी वेठबिगार कायद्याच्या कलमान्वे आरोपपत्र दाखल करण्यात यावे. ४) पिडीत कुंटुबियाना २५ लाख रुपयाची मदत देण्यात यावी ५) आत्याचार प्रतिबंध आधिनियम व बाल लैगिंक आधिनियमा प्रमाणी मिळणारी नुकसान भरभाई रक्कम विना विनालंब पिडीत परिवारास तत्काळ देण्यात यावी.६) गुन्हा नोंदवुन घेण्याकास विलंब करणार्या आधिकार्यावर गुन्ह्यात सह आरोपी करण्यात यावे आशी ही मागणी करण्यात आली आहे.या वेळी संघटनेचे प्रमुख मारुती गुंडीले यांचे सह संघटनेचे लक्ष्मण रणदिवे, लक्ष्मण जानतीने. बालाजी गुडसुरे सरपंच गव्हाण. हरीभाऊ राठोड दिपक सोनकांबळे, महिला आघाडी जळकोट ता.आध्यक्षा आनिता गायकवाड, ता.उपाध्यक्षा शारदाताई मुंगे.जळकोट ता.सचिव चौतराताई नवाडे सह शंभर महिला उपस्थीत होत्या.