संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या सहकार्याने आणि मा.सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (LIDCOM) दिनांक 17.09.2023 ते 20.09.2023 पर्यंत इटली मिलान येथे 124 व्या MIPEL प्रदर्शनात महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल व चर्मवस्तुंचे जगभरात मागणी नोंदविण्यासाठी प्रदर्शनामध्ये पहिल्यांदाच सहभाग घेतला आहे.त्यामुळे नव उद्योजकांना नवी उर्जा मिळणार आसल्याचे चर्चिले जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रथमच चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवद्योजकांना या प्रदर्शनात सहभागी करण्यात आले आहे. याचे सर्व श्रेय या महामंडळाला लाभलेले व्यवस्थापकीय संचालक डि.जी.गजभिये सर यांच्यामुळे कारण महाराष्ट्र राज्यात चर्मकार समाजासाठी विकास घडावा उद्योजक निर्माण व्हावेत या उद्देशाने सदर महामंडळाची स्थापना राज्य शासनाने केली आहे परंतु आज महामंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. परंतु आद्याप पर्यंत ज्या समाजासाठी महामंडळ निर्मित झाले आहे. त्या समाज घटकांना आपल्यासाठी महामंडळ आहे हे ही माहिती नाही. त्याच बरोबर उद्योजक घडवण्यासाठी सदर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अथवा आध्यक्षांनी कधी प्रयत्न केल्याचे जानवत नाही म्हणूनच तर अनेक समाज घटक जसे होलार समाज, मोची समाज आहे. यातील उद्योजक निर्माण होऊ शकले नाहीत ही खंत प्रकर्षांने जानवते.!


सध्या कार्यरत व्यवस्थापकीय संचालक आसलेले डि जी गजभिये सर सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतीक, औद्योगिक क्षेत्रात भारतीय संविधानाच्या आधिन राहून कार्य करीत आहेत.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे इटलीत झालेल्या चर्मोद्योग प्रदर्शनात पहिल्यांदाच भारतीय चर्म वस्तूंचे प्रदर्शनात झालेली एंट्री होय.या प्रदर्शनात कोल्हापुरी चपलांस उस्पूर्त प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले. त्याच बरोबर आनेक चर्म वस्तूंना मागणी होत आसल्याचे निदर्शनास आले. यामुळे भारतीय चर्मकार कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठेत मोठा वाव मिळणार आसल्याने संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची उंच भरारी म्हणावे लागेल. यामुळे नव उद्योजक मोठ्या उत्साहात महामंडळाच्या सहकार्याने उद्योगात भरारी घेणार यात काही शंका नाही. महामंडळाच्या ध्येय उद्देशानूसार चर्मकार समाजातील समाज घटक होलार, मोची,ढोर,चांभार या सर्वांना समान न्याय दिला गेला पाहिजे. जे विकासाच्या बाबतीत मागे राहीलेत त्यांना बरोबरीने आनले पाहिजे. ज्यामुळे समसमान विकास होण्यासाठी सामाजिक न्यायाची भुमिका मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, व सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डि.जी.गजभिये सर आगामी काळात लक्षपूर्वक कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करीत भावी कार्यासाठी सदिच्छा..!!