देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे,

देवणी तालुक्यातील जागर हिंसा मुक्तीचा अभियानाची चवनहीप्परगा गावातून सुरुवात युरोपियन युनियन आणि स्विसएड पुणे यांच्या सहकार्याने ग्रामीण महिला विकास संस्थेच्या वतीने देवणीतील वीस गावात अभियान राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात चवनहीप्परगा गावातून करण्यात आली.या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती अवसेकर एम. डी. सचिव-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सुमेधा शिंदे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रद्धा चौधरी दयानंद विधी महाविद्यालय लातूर गावच्या सरपंच श्रीमती शकुंतला मोरे,बब्रुवान पाटील ग्राम विकास अधिकारी उदगीर, उपसरपंच इस्माईल शेख,सामाजिक कार्यकर्ते माधव मोरे,योगेश पल्लेवाड गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.कुशावर्ता बेळे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कचराताई गायकवाड, गिरीष सबनीस, प्रेरणा जाधव,विकास बिरादार,कृष्णा इंगोले,नागनाथ सूर्यवंशी,सत्यशीला सरवदे,विजयश्री बोचरे,सरोजा शिंदे प्रेरक ज्ञानेश्वर बिरादार,प्रेरीका संजीवनी गोसावी व तसेच दयानंद विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी गावातील महिला, पुरुष, युवक, युवती ग्रामपचायत सदस्य, विस गावातील प्रेरक प्रेरिका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.