देवणी / प्रतिनिधी : श्रमीक हक्क अभियान महाराष्ट्र, एन.सी.डी.एच.आर भारत, कष्टकरी संघटना महाराष्ट्र, मराठवाडा एन.जी.ओ. फोरम, एकल महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सिध्दार्थ नगर, देवणी येथील राष्ट्रीय कार्यालयाच्या प्रांगणात आयोजीत 10 डिसेंबर ते 31 डिसेंबर मानवी हक्क संविधान जागृती सप्ताहचे उद्घाटनकरण्यात आले. उदघाटक म्हणून देवणीचे तहसीलदार सुरेशजी घोळवे, गणेशजी सोंडारे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करून व भारतीय संविधानाचे पुजन करून ध्वजारोहणाने सामुहीक मानवंदना देवून मानवी हक्क व संविधान जागृती सप्त्याचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे कायदेविषयक सल्लागार अॅड. जे.बी.भाले हे होते तर तहसीलदार सुरेशजी घोळवे,पोलीस निरीक्षक गेणशजी सोंडारे यांचे पुष्पहार शाल व संविधानाची प्रती देवून सन्मान व सत्कार करण्यात आला. सदर संविधानाचे आधिन राहून देशसेवा, लोकसेवा, सेवा हमी कायदयाची सर्वसामान्याना न्याय देण्याचे औचीत ठेवून संविधान प्रतीने सत्कार केले. 10 डिसेंबर 2021 मानवी हक्क दिन संविधानाच्या प्रती व मानवी हक्क 21 विविध मागण्यांचे राष्ट्रपती, पंतप्रधान मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्र व राज्याच्या मंत्री महोदयाना व आयोगाना मा.तालुका तहसीलदार तथा दंडाधिकारी सुरेशजी घोळवे साहेब यांच्या मार्फत मंचावरच निवेदन देवून सर्वासमक्ष सादर करण्यात आले.
त्याच बरोबर मानवी हक्क दिनाच्या उदघाटनाच्यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. पो.हे.का. विनायक कांबळे, पो.हे. का. भुजागीरे सत्कार करण्यात आला त्यात देवणी शहराच्या पहील्या नगरउपाध्यक्ष्या मा. सौ. अंजलीताई जिवणे यांचा सत्कार महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख अनितातई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला, त्याच बरोबर माझी जि.प.बांधकाम सभापती नागेशजी जिवणे, प्रा० डोगेसर पान 2 वर पंडीत दिनद्याक, मुजीब तांबोळी, कृष्णा पिंजरे पत्रकार
माझी जि.प.सदस्य वसंतजी कांबळे, अॅड. गुप्ताजी, मा.बालाजी टाळीकोटे बी.टी.व्ही. चॅनलचे प्रमुख, मा. अनील इंगोले, अमर मुर्के, अंगद गवळी माकणी, सुधाकर जाधव माकणी, दत्ता शिंदे निलंगा, गोविंद शिंदे उदगीर, परमेश्वर होळकर जवळगा, सुधाकर गायकवाड दरेवाडी, अशोक सुर्यवंशी संगम, दिंगबर कांबळे हंचनाळ, प्रकाश शिंदे, अविनाश कांबळे, विदयाप्रसाद शिंदे, उमाकांत कांबळे, भिम पंतगे, लक्ष्मण सोनकांबळे, देवानंद सावंत, हुसेन धोत्रे, मुजमील मल्लेवाले, संजय शिरापुरे, विश्वनाथ पंतगे, बाबुराव बटनपुरकर, हरिचंद्र बुकटे, शिवाजी सांळूके सह, शेषबाई गायकवाड दरेवाडी, नरसाबाई कांबळे हंचनाळ, सर्वणा गायकवाड संगम, बालीका होळकर, अनिताताई कांबळे यांचा सत्कार करून मानवी हक्क दिनाचे महत्व सांगतांना अॅड.जे.बी.भाले म्हणतात अविरत चालते बोलते कायदयाचे व सर्वसामान्यांना न्याय देण्याचे विद्यापीठ म्हणजेच ज्ञानेश्वर सुर्यवंशी भाऊ असा उल्लेख करून आमचा लढा न्यायासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी या संघटनेच्या घोषवाक्याची गर्जना करून जगण्याचा अधिकार, सर्वांगीन विकासाच्या अधिकारावर भर देवून मागणी करून न्याय देण्याच्या कामी श्रमीक हक्क अभियानास बांधील राहून कायमचे काम व कार्य करण्यासाठी कोर्टाचे दार आमच्याकडून संघटनेच्या सर्व कार्यकर्ते व सभासदाना त्यांच्यासोबत राहणाऱ्या मान्यवरांना तत्पर सेवा देण्याचे आज जाहीर करतो असे कबूल केले.
पुढे बालाजी टाळीकोटे यांनी मानवी हक्क दिनाच्या भाषणात मानवी हक्काचे व संविधानाचे पुर्णता महत्व सांगतांना म्हणाले की, प्राथमीक, माध्यमिक शाळेत संविधान तासीका सुरू करावी. मराठी हे सर्वच माध्यमांच्या शाळानी संविधानीक तासीकाचे दैनंदीन वेळापत्रकात समावेश करावा अशि संविधानदीन संघटनेने केलेल्या मागणीचे अवर्जुन उल्लेख केले. त्याच बरोबर प्रा. डॉ. अनिल इंगोले यांच्याही भाषणात परीश्रमीत व खडतर प्रवासात आहोरात्र चंदनापरी झिजून काम करणाऱ्या ज्ञानेश्वर भाऊ सोबत आम्ही आमचा परीवार सोबत राहू असे जाहीर केले. याप्रसंगी अमर मुर्के यांनी ही भाषण केले, हुसेन धोत्रे सुत्र संचालन तर दशरथ कांबळे यांनी प्रसतावीक केले.
समारोप प्रसंगी ज्ञानेश्वर सुर्यवंशी भाऊ म्हणतात प्रत्येक जातीत संविधाना बाबत जागृती व्हावी ओ.बी.सी. नो जागे व्हा! ओ.बी.सी. नो जागे व्हा !! असे ठणकावून सांगतांना संविधानामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. संविधानामुळेच आपल्याला माणुसपण मिळाले आहे. आणि संविधानामध्येच आपले जिवणाचे कल्यान आहे. याची जाणीव पुन्हा पुन्हा करून दयावी लागणार आहे. कारण संविधान सुरक्षीत तर आपले अधिकार हक्क सुरक्षीत राहणार आहेत. आपले अधिकार हक्क सुरक्षीत तर आपले भविष्य सुरक्षीत राहणार आहेत. याची जाणीव सर्व जाती जमातीत करावी लागणार आहे. म्हणूनच आज ओ.बी.सी.तील बहुजनातले अधिकारी म्हणून भारतीय संविधान देऊन संघटनेने सत्कार व सम्मान केलेला आहे. यावेळी देवणी तालुक्यातील एकल महिला, विधवा परीतक्त्या महिला, आशा कार्यकर्त्या, नगरपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी, गावठाण विस्तार वाटप समीती, हातावर पोट असनारे हाथगाडे, तरकारीवाले, कटलरीवाले, शेतकरी, शेतमजुर, गायराणधारक, गावठाणधारक, भूमीहीन सह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजक व नियोजक समिती दशरथ कांबळे, हुसेन धोत्रे, बाबासाहेब सुर्यवंशी, भिम पंतगे, अविनाश कांबळे, मारोती कांबळे, अखिल मल्लेवाले, संगमेश्वर फुलवाले, विद्याप्रकाश शिंदे, उमाकांत कांबळे यासर्वानी परीश्रम घेऊन आयोजन केले. शेवटी राष्ट्रगीत घेवून राष्ट्राला अभिवादन करून, महापुरूषांच्या जयघोषाने समारोप करून सर्वाना जेवणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.