देवणी तालुक्यात बेकायदेशीर केबलचे काम करणाऱ्या जिओ कंपनीवर कार्यवाई करण्यात यावी याप्रमुख मागणीसाठी मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
देवणी / प्रतिनिधी : तालुक्यात जिओ कंपनीने अनधिकृत बेकायदेशीर केबलचे काम चालू केले असून त्याविषयी कोणत्याही प्रकारचीअधिकृत परवानगी घेतली नसून त्यामुळे शासकीय मालमतेचे नुकसान होत आहे या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाई करण्यात आली नाही प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी मातंग अस्मिता संघर्ष समितीचे देवणी तालुकाध्यक्ष जितेशभाऊ रणदिवे यांनी देवणी तहसील कार्यालयासमोर अमोरण उपोषण चालू केले आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस असून तात्काळ जिओचे अनधिकृत काम करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी नाहीतर या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मास संघटनेने दिला आहे हे अनधिकृत काम करणाऱ्या जिओ ठेकेदारा सोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर्थिक गैरव्यवहार करून सहकार्य करीत आहेत त्यामुळे जिओ ठेकेदार यांची अरेरावी वाढली आहे जिओ या ठेकेदार यांनी मोबाईल वरून जिवे मारण्याची धमकी मला दिली असून या गुंड प्रवृतीच्या ठेकेदाराकडून माझ्या जिवीताला धोका असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे यांची रीतसर चौकशी करून तात्काळ कार्यवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषण कर्ते जितेश भाऊ रणदिवे यांनी केले आहे



