जिल्हाधिकारी लातूर कार्यालयातील माहिती अधिकारी तथा महसूल सहाय्यक गोविंद माने यांना पाच हजार रुपयांचा दंड..
देवणी / प्रतिनिधी : दिनांक 18 .9 .2021.
माहिती अधिकार कार्यकर्ते पांडुरंग कदम राहणार देवनी जिल्हा लातूर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावर काय कारवाई केली अशी विचारणा माहिती अधिकारांतर्गत केली असता कार्यवाही न केल्यामुळे राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद आयुक्त दिलीप धारूरकर यांनी कलम 7(1) नुसार कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी यांनी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा महसूल सहाय्यक गोविंद माने यांना पाच हजार रुपये दंडाची रक्कम शासन जमा करण्याचे आदेश दिले.
थोडक्यात असे की जोडपत्र अ. माहितीची मागणी दिनांक.11.01.2018 रोजीच्या अर्जावर कारवाई न केल्यामुळे कलम 19 (1) नुसार प्रथम अपील उपजिल्हाधिकारी लातूर दिनांक.07.03.2018. रोजी दाखल केले. काही दखल घेतली नाही. तदनंतर पांडुरंग कदम यांनी माहिती आयोगाकडे धाव घेऊन द्वितीय अपील कलम 19 (3) नुसार दिनांक.20.04.2018. रोजी दाखल केले .सुनावणी घेऊन अपील क्रमांक.2171/2018. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दिनांक.14.05.2020. रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन जन माहिती अधिकारी महसूल सहाय्यक संकीर्ण गोविंद माने यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड शासन जमा करण्याचे आदेश दिले. व प्रथम अपील अधिकारी अपर जिल्हाधिकारी यांनी कलम 19(6) नुसार. प्रथम अपिलावर सुनावणी घेऊन निर्णय आदेश पारित करणे बंधनकारक आहे. असे आपण केले नाही. अप्पर जिल्हाधिकारी लातूर यांना ताकीद देण्यात येते आपण असे चुका करू नये अन्यथा आपल्याविरुद्ध कारवाई करावी लागेल.
आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली किंवा नाही अशी विचारणा माहिती अधिकारात केली असता. निर्णय आदेश प्राप्ती पासून पंधरा महिन्यानंतर दिनांक.31.08.2021 रोजी दंडाची रक्कम पाच हजार रुपये महसूल सहाय्यक संकीर्ण गोविंद माने यांनी चलनाद्वारे जमा केली.