Z P कमालवाडी कु.मरपल्ले वेदिकाचे पंढरपूर शाळेच्या वतिने भव्य सत्कार
देवणी / प्रतिनिधी : दिनांक 8.10 2021 रोजी पूज्य कुमार स्वामी विद्यालय पंढरपूर विद्यालयाच्या वतीने मरंपल्ले वेदिका सतीश Z P कमालवाडी शाळेच्या विद्यार्थिनीची जवहार नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्यामुळे तिच्या अभिनंदनाचा सत्कार कार्यक्रम शाळेने आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य स्वामी एस जी साहेब ,कमालवाडी शाळेचे मुख्याध्यापक उदबाळे व्ही डी सर हजर होते. तसेच पालक अतिथी म्हणून सय्यद श्यामदभैया ,मरपल्ले बाबुरावजी, चांमले भागवत अण्णा, व शाळेतील सर्व शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी संपूर्ण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह हा कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यालयाच्या वतीने कु. वेदिका मरपले हिचा व तिच्या आई-वडिलां सह तिला घडविणारे उदबाळे सर यांचा अभिनंदन पर सत्कार करून त्यांना गौरविण्यातआले आहे. वेदिकाने मला मिळालेल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळेच मी हे यश संपादन करू शकले. अशा शब्दात मनोगत व्यक्त केले आहे. अध्यक्षीय समारोप प्रसंगी मुख्याध्यापक उदबाळे विश्वनाथ सर यांनी जिद्द, चिकाटी ,मेहनत ,पॉझिटिव्ह थिंकिंग, या गुणांमुळेच विद्यार्थी उज्वल यशाचे खरे मानकरी कसे बनू शकतात. अशा शब्दात. अत्यंत छान पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सूर्यवंशी जी एस सर यांनी केले तर सुंदर अशा शब्दात आभार प्रदर्शन बिराजदार आर टी सर यांनी केले.