उदगीर प्रतिनिधी- जि.प .प्राथमिक विद्यालय, सोमनाथपुरच्या वतीने दि. 26 डिसेंबर रोजी बाल दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून सोमनाथपुर ग्राम पंचायतीच्या सरपंच सौ. अंबिका पवार ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अमितकुमार माडे, उदगीर विधानसभा संयोजक वसंत शिरसे , तालुक्याचे भाजपा सोशल मिडिया संयोजक अमोल भालेराव, भाजपा उदगीर तालुका अध्यक्ष शिवशंकर धूप्पे, विश्व हिंदू परिषदेचे उदगीर शहर अध्यक्ष महादेव घोणे, ग्रामविस्तार अधिकारी अवकाश पवार, ग्रा.पं. सदस्या तथा भाजपा उदगीर तालुका उपाध्यक्षा शिवकर्णा अंधारे, ओमकार निरने, आशा कार्यकर्त्या, मुख्याध्यापक स्वामी सर उपस्थित होते .
यावेळी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले .याप्रसंगी वसंत शिरसे व महादेव घोणे यांनी बालदिनाचे महत्व सांगितले व उदगीर तालुका अध्यक्ष शिवशंकर धुप्पे यांनी आणलेल्या सोनपापडीने विद्यार्थ्यांचे तोंड गोड करून बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विधार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या शेवटी आभार पळसकर सर यांनी मानले.
ग्रामविस्तार अधिकारी अवकाश पवार व लिपीक सुष्मा वाघमारे यांचा सत्कार
या वेळी मौ .सोमनाथपुर ग्राम पंचायत येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस सर्वांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यानंतर मौ .सोमनाथपुर ग्राम पंचायतीच्या वतीने एक महिन्यात एक लाखाच्यावर कर वसूल केल्यामूळे जि.प .व प .सं .च्या वतीने सोमथपूर ग्रामपंचायतचा गौरव करण्यात आला यानिमीत माजी आ. सुधाकर भालेराव व श्रद्धा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा.पं. सदस्या तथा भाजपा उदगीर तालुका उपाध्यक्षा शिवकर्णा अंधारे यांच्यावतीने ग्रामविस्तार अधिकारी अवकाश पवार व लिपीक सुष्मा वाघमारे यांचा सत्कार काण्यात आला .
यावेळी उपसरपंच अमितकुमार माडे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल राठोड, सदस्य निरणे, सुभाष राठोड, लक्ष्मण राठोड, शुभम पाटील व गावातील नागरीक राजू वैजापूरे, श्रीदेवी राठोड, नामदेव आडे, मुकेश घोगरे आदी उपस्थित होते .
