जीवन ज्योती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था विळेगाव या संस्थेला राष्ट्रसंत डॉ.रामराव महाराज आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार २०२५ ने सन्मानित.
देवणी, लक्ष्मण रणदिवे.
देवणी तालुक्यातील जीवन ज्योती बहुद्देशीय सेवाभावी संस्था विळेगाव संस्थेला राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार हे ११जानेवारी रोजी धर्मगुरू तपस्वी संत डॉ.रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन द्वारा ११ जानेवारी २०२५ रोजी दिला जाणारा राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार २०२५ हा जीवन ज्योती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था विळेगाव या सामाजिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला देण्याचे जाहीर करण्यात आले आहे .संस्थेचे सचिव तथा क्रिएटिव्ह इंग्लिश अकॅडमी चे संचालक प्रा. राहुल प्रकाश चव्हाण सर यांच्या कार्याचा सन्मान केला जात आहे .त्याबद्दल प्रा. राहुल प्रकाश चव्हाण सर यांनी निवड समिती व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे आभार मानले व अशा पुरस्काराने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचे नवचैतन्य मिळाल्याचे व्यक्त केले.