देवणी / प्रतिनिधी : येथील देशोन्नती वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी दत्ता पाटील यांना पत्रकारीतेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकारीता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रदीप ढगे व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान उदगीरचे अध्यक्ष प्रा.विवेक सुकणे यांनी ही निवड झाल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.
मराठा सेवा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान शाखा उदगीरच्या वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, आरोग्य, शेती , प्रशासन, पत्रकारीता क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार दिला जातो.

यावर्षी पत्रकारिता क्षेत्रातील जिल्हास्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार देशोन्नती वृत्तपत्राचे देवणी तालुका प्रतिनिधी यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दि.२४ ऑक्टोबर २०२१ रोजी येथील रघुकुल मंगल कार्यालयात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यावरण राज्यमंत्री मा.संजय बनसोडे यांचे हस्ते व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.विवेक सुकणे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकारितेचा कुठलाच वारसा नसताना गेल्या विस वर्षांपासून दत्ता पाटील यांनी तालुका भरात नियमीत शेती, शेतकरी, शेतमजूर आशा सर्व सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कार्य केले आहे. म्हणजे सामाजिक, शैक्षणीक व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या लेखणीच्या माध्यमातून उल्लेखनीय असे कार्य केले.त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मित्र परिवारातून व पत्रकार बांधवांतून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp