ज्ञान,धन,वेळ व पदाचा उपयोग नाहीरे वर्गाचे दुःख दुर करण्यासाठी करावा— व्यंकट दंतराव
लातूर / प्रतिनिधी : मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल व्यंकट दंतराव यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत विश्व मानवाधिकार संरक्षण आयोग,नवी दिल्ली.या जागतिक संस्थेने व्यंकट दंतराव यांच्या सामाजिक शैक्षणिक व साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली.त्याबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर ऍडव्होकेट फोरम, बहुजन समाज कर्मचारी महासंघ (बीसेफ),कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघ,सेट नेट पीएच डी धारक प्राध्यापक संघ व शांतिदुत अर्बन निधी या सामाजिक व आर्थिक संघटना,संस्थांच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सेट नेट पीएचडी धारक प्राध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र सुर्यवंशी, ऍड.फोरमचे राजकूमार गंडले, दिपक साठे,बीसेफचे प्रा.रामराव वाघमारे, बालाजी जोगदंड,कास्ट्राईबचे अण्णा नरसिंगे, प्रकाश गायकवाड, मुख्याध्यापक गंगाधर गवळी,सलोकता काळे ताई, डॉ गवळी,मुक्ता साळवे महिला आघाडीच्या सुनिता सुर्यवंशी,उद्योजक निखिल साठे,शांतिदूतचे व्यवस्थापक,भागूराम ढोबळे,तसेच प्रा.अशोक गोटमुखले,इंजि.विवेक डोंगरे,भारत,सुनिल सुर्यवंशी, ज्ञानदेव शिंदे,दगडु गारकर,व दंतराव कुटुंब हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बळीराम भोगे यांनी केले होते.व्यंकट दंतराव हे गेल्या वीस वर्षापासून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून,समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत.शाळेतील सालगड्यांच्या पाल्यांना दरवर्षी वह्या पेन शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देतात, कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी सांगुन न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात, भारत स्काऊट गाईड महाराष्ट्र राज्य कार्यालयाने त्यांना सहाय्यक जिल्हा आयुक्त हे पद बहाल केले आहे त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना स्काऊट आणि गाईडचा राज्यपाल पुरस्कार मिळाला आहे,ते रक्तदान शिबीरे, महिला मेळावे, साहित्य संमेलने आयोजित करतात, स्वतः 25 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे.वृक्षारोपण मोहीम राबवतात.विद्यार्थ्यांना, सामाजिक संघटनांना आर्थिक मदत करतात.कुटुंब नियोजनासाठी प्रमोटर म्हणून कार्य करतात, अनेक बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचे धडे देतात .एक अभ्यासू,विद्यार्थी प्रिय शिक्षक,शीलवान, प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता, प्रभावी व आक्रमक,शिक्षक नेता, संवेदनशील मनाचा कवी,लेखक व कुशल संघटक अशी त्यांची राज्यभरात ओळख आहे.सत्काराला उत्तर देताना व्यंकट दंतराव यांनी आपण केलेल्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक राजकीय वा अन्य कोणत्याही क्षेत्रातील प्रामाणिक कार्याची दखल कोणीतरी घेतेच घेते.पण कोणीतरी दखल घ्यावी म्हणून काम करु नका समाजातील नाहीरे वर्गाचे अज्ञान,दुःख, दारिद्र्य संपविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा,वेळेचा,पदाचा व संपत्तीचा उपयोग करावा.अशी भावना व्यक्त केली.

शाश्वत हॉस्पिटल व शांतिदूत मेडीकल लातूरच्या वतीने आयोजित मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.घोडके यांचा सहृदय सत्कार करताना शांतिदूत अर्बन निधीचे संचालक डॉ व्यंकट दंतराव व दंतराव परिवार!

