हे काळ्या आईवर झोपलेलं जे मुलं दिसतंय.ते भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं आहे.आपल्या पोटचा गोळा असा रानावर सोडून भाजीपाला पिकवावा लागतो.
बरं हे राहू द्या.तुम्ही प्रॅक्टिकल लोकं ना!मग,तुम्हाला प्रॅक्टिकल प्रश्न.हाच टोमॅटो चार-पाच महिन्यापूर्वी भाव मिळत नसल्याने शेतकरी रस्त्यावर फेकत होता.तेव्हा त्याच्या भावा बद्दल आपल्या तोडून चकार शब्द का फुटले नाहीत?तेव्हा काय यातना झाल्या असतील त्या शेतकऱ्यांला?थोडी कल्पना करा? उद्या,याच टोमॅटो आणि भाजीपाल्याचे भाव,खर्च सुद्धा निघणार नाही,एवढे होतील.तेव्हा त्याचं काय?
मग,प्रॅक्टिकल लोकांना माझा हाच प्रश्न आहे.की,आपल्या देशात,याचा भाव निश्चित केला पाहिजे.कमीत कमी भाव किती?आणि जास्तीत जास्त भाव किती?
आपल्या देशात शेतीमालाच्या हमीभावाचा कायदा झाला पाहिजे.आणि त्यात भाजीपाला समाविष्ट केला पाहिजे.
मग,या मुद्द्यावर तुम्ही प्रॅक्टिकल लोकांनी पण आवाज उठवला पाहिजे.
शिवशंकर पाटील कलंबरकर
(मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना)
