डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना जाहिर
आदिलाबाद (प्रतिनिधि) : ‘अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद’ या अराजकीय सामाजिक संघटनेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर यांना आदिलाबाद (तेलंगणा) येथील गुरु रविदास समाज सेवामंडळाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
गुरु रविदासांच्या ६२७ व्या जयंतीनिमित्त गुरु रविदास मंदिर, चिलकुरी लक्ष्मीनगर आदिलाबाद येथे राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिव्हल – २०२५ चे आयोजन करण्यात आले असून त्यात प्रथमच यावर्षीपासून राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. यावेळेस “रविदासीया आंबेडकरी कविसंमेलन” ही आयोजित करण्यात आले आहे.
गुरु रविदास अभिवादन यात्रेच्या माध्यमातून आदिलाबाद व तेलंगणा परिसरात सर्वप्रथम गुरु रविदासांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी करणारे इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची यावर्षीच्या पहिल्या मानाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे परिवर्तनवादी विचारांचे निष्ठावान सामाजिक नेते, साहित्यिक, लेखक, पत्रकार व परखड व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. रघुनाथ ईटकरे, दादाराव कदम, डाॅ. अलका गव्हाळे, सुकुमार पेटकुले यांनाही हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे या फेस्टिव्हलचे अध्यक्ष कवी मधू बावलकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp