• डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वकिली प्रारंभ दिन शताब्दी सोहळा बार्टी साजरा करणार *

पुणे — दिनांक 6 सप्टेंबर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील ग्रेज इन या संस्थेतून संपादन केलेल्या बॅरिस्टर या पदवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाची वकीलीची सनद प्राप्त करून 5 जुलै 1923 रोजी वकिलीस प्रारंभ केला या ऐतिहासिक घटनेला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या संस्मरणिय घटनेची शताब्दी साजरी करण्यासाठी बार्टी संस्थेचे महासंचालक मा. सुनिल वारे यांच्या संकल्पनेतून बॅरिस्टर डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या वकिली प्रारंभ दिनाचे दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पस येथील पदवीदान सभागृहात शताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे , बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा , मुंबई विद्यापीठ , अधिवक्ता परिषद कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने हा शताब्दी सोहळा संपन्न होत आहे.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे महामहीम मा. राज्यपाल मा. श्री रमेश बैस, मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश मा. देवेंद्रकुमार उपाध्याय, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
श्री सुनिल वारे
( महासंचालक , बार्टी ) पुणे, प्रोफेसर डॉ. रविंन्द्र कुलकर्णी ( कुलगुरू , मुंबई विद्यापीठ) डॉ अजय भामरे,
(प्र -कुलगुरु मुंबई विद्यापीठ)
अॕड डॉ बिरेंद्र सराफ, (महाधिवक्ता महाराष्ट्र,) अॕड विवेकानंद घाटगे,
( अध्यक्ष – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ) अॕड डॉ उदय वारूंजीकर
(- उपाध्यक्ष बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवा ) अॕड अंजली हेळेकर,
(राष्ट्रीय सचिव -अभिवक्ता परिषद ) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून उद्घाटन समारंभानंतर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन होणार असुन या सोहळ्यास मोठ्या संख्येने कायदयाचे अभ्यासक , तज्ञ, वकिल व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बार्टी संस्थेचे महासंचालक मा सुनिल वारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp