डॉ हनुमान सुरनर यांना अर्थशास्त्राची पिएचडी पदवी बहाल

पुणे / प्रतिनिधी : मराठवाड्यातील चाकूर तालुक्यातील अलगरवाडी येथील सुपुत्र प्रा.हनुमान किशनराव सुरनर यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने मानव्य विद्याशाखे अंतर्गत अर्थशास्त्र या विषयात पिएचडी(डॉक्टरेट) पदवी नूकतीच बहाल करण्यात आली.
डॉ हनुमान सुरनर हे सध्या आमदार प्रकाश देवळे माध्यमिक व ज्युनिअर कौलेज शिरगाव ता.मावळ जि.पुणे येथे सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत.सदर डाक्टरेट पदवी ही डॉ अरविंद शेलार व संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार प्रकाश देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
डॉ हनुमान सुरनर हे मराठवाड्यातील ग्रामीण भागातील सर्व सामान्य कुटुंबात जन्माला आले आसले तरी शिक्षणविषयक तळमळ, जिद्द,मेहनत, सातत्य, सकारात्मक दृष्टिकोन आसल्याने मराठवाड्यातील होलार समाजातील पहिले डॉक्टरेट मिळविणारे व्यक्ती ठरले आहेत.
त्यांच्या जिद्दीला, मेहनतीला आणी त्यांच्या कार्याला बि मिडिया माध्यम समुहाचा सलाम.. सरांनी आशीच उतरोत्तर प्रगती करावेत आशा शुभ कामना संपादक बालाजी टाळीकोटे,प्रा.एम.एम.सुरनर,प्रा.
संतोष गडदे सरजेराव टाळकुटे,प्रा.चंदर टाळकुटे, प्रा.दशरथ टाळकुटे आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp