देवणी तहसीलदार पदावरून बदली होऊन आज कार्यमुक्त झालो आहे.


लोकसभा 2019 च्या पार्श्वभूमीवर 12 फेब्रुवारी 2021 रोजी मी तहसीलदार देवणी या पदाचा पदभार घेतला होता. आज 6 जुलै 2023 रोजी मी कार्यमुक्त झालो आहे.
आतापर्यंतचा सर्वाधिक सुमारे चार वर्ष साडेचार महिने इतका कालावधी देवणी तालुक्यात मला लाभला …
या कार्यकाळात सन्माननीय आमदार महोदय, सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी सर्व शेतकरी बंधू भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू तसेच मा. जिल्हाधिकारी यांचेसह माझे वरिष्ठ अधिकारी व सहकारी अधिकारी-कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार…

लोकसभा निवडणूक २०१९, विधानसभा निवडणूक २०१९ ,
ग्रामपंचायत निवडणूक २०२०, नगरपंचायत निवडणूक 2021,
कोरोनाची पहिली लाट व दुसरी लाट यामध्ये केलेले काम,
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक २०२१,
खरीप हंगाम 2019, 2020, 2021, 2022 मधील नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप,
शासकीय वसुली, महाराजस्व अभियान ,अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी केलेल्या कारवाया, सातबारा संगणकीकरण, ई पीकपाहणी, शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करणे आदी महसुली प्राधान्याची कामे, निरंतर सुरू असणारे मतदार यादी संदर्भातील कामकाज, पुरवठा विभागातील रेशन कार्ड वितरण आणि अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देणे तसेच संजय गांधी विभागातील योजना लाभार्थी निवड व‌ वेळेवर अनुदान वितरण यामध्ये देवणी तालुक्यातील कामकाज चांगले करण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये विशेष लक्षात राहण्यायोग्य गोष्टी म्हणजे-
कोविड-19 कालावधीत देवणी तालुक्यातील कामकाज सर्वांच्या सहकार्याने खूप चांगले करण्यात आले.
तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने सुरू केलेली वृक्ष लागवड मोहीम तालुक्यातील सर्वच गावापर्यंत पोहोचली.
सातबारा संगणकीकरण मध्ये देवणी तालुका मराठवाड्यामध्ये प्रथम क्रमांकावर आला.
शेत रस्त्याची अनेक प्रकरणे मार्गी लागली या गोष्टी समाधान देऊन जातात. मात्र तालुक्यातील तहसील कार्यालयासह इतर अनेक विभागात रिक्त पदे असल्यामुळे क्षमतेनुसार आणखी काही कामे करता आली असती याची खंत देखील वाटते.
एकंदरीतच देवणी तालुक्यातील हा माझा कारकीर्दीतील सर्वात मोठा कालावधी असून आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी घेऊन मी आज कार्यमुक्त होत आहे.
सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
सुरेश घोळवे
तहसीलदार देवणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp