देवणी येथील तहसील कार्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न
देवणी / प्रतिनिधी : येथील तहसील कार्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त ज्ञानाचे प्रतीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सविंधान रक्षण ही काळाची गरज, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे , सामाजिक शांततेसाठी कायद्याचे राज्य, आर्थिक विषमता नष्ट करणेसाठी घटनेची उद्देश पत्रिका समजण्याची गरज, मुलभूत हक्कासोबत मुलभूत कर्तव्याची जाणीव हवी इत्यादी विषयांवर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देवणीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री सुरेश घोळवे यांनी भुषविले. तर कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून गटविकास
अधिकारी श्री सोपान अकेले उपस्थित होते. यावेळी देवनीचे नायब तहसीलदार श्री विलास तरंगे, रसिका महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के आणि देवणी येथील ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कुशावर्ता बेळे यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. सदरील स्पर्धेत सर्व प्रथम येण्याचा मान कु. कांबळे निकिता पुंडलीक हिने पटकाविला, सर्व द्वितीय कु. कांबळे अंकिता पुंडलीक तर सर्व तृतीय पारितोषिक खानापुरे वीरेंद्र नागेश्वर याने पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिक कांबळे विश्वजीत बबनराव व संविधान समाधान देवनिकर यांनी
पटकाविले. यावेळी रस्ते नियमांवरील व्हिडिओ स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या स्पर्धकांना देखील पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुग्रीव बिरादार यांनी केले. यावेळी देवणी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार सविता माडजे, अव्वल कारकून माधव सोळंके, रितेश कवरे, मंडळ अधिकारी उध्दव जाधव, बालाजी केंद्रे, यासह धनराज भंडारे, अमर सुरवसे, प्रसाद जाधव, विजयकुमार हांदेश्वर आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.











