भालेरावांना टिकिट मिळताच..बनसोडेंची धडधड वाढली..!!


उदगीर / प्रतिनिधी (टाळीकोटे एम.बि.) : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तेंव्हापासून उदगीर विधानसभा क्षेत्रात चर्चेला उधाण आले. आता आघाडी कडून कोण.? आणी युतीचा कोण? आशा चर्चा चालू आसताना आखेर महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिक्रत उमेदवार म्हणून माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने उदगीरात एकच जल्लोष झाला कार्यकर्ते फटाके फोडून आनंद साजरा करीत होते..प्रतेकाच्या चेहऱ्यावर आनंदोत्सव दिसत होता..कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत सुधाकर भालेरावांना डावळून टिकीट नवख्या उमेदवाराला देवून भालेरावावर एक प्रकारे आन्याय झाला होता त्याचकारणाने मतदारसंघात मतदार भाजपाच्या खेळीला उत्तर म्हणून संजय बनसोडे यांना पसंदी देत आमदार पदाची माळ गळ्यात घातली.परंतु स्थानिक आसलेले भालेराव मात्र उपेक्षित राहिले. परंतु विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत होती तसतशी महाराष्ट्रात आनेक उलथापालथ होऊन ईकडचे आमदार तिकडे आणि तिकडचे आमदार ईकडे झाले. आसाच प्रकार उदगीर विधानसभा निवडणुकीत दिसत आहे.


ना.संजय बनसोडे यांना विकासाच्या नावाखाली मी पुन्हा मोठ्या मताधिक्याने येऊ वाटत आसताना महाविकास आघाडीची उमेदवारी मात्र माजी आमदार सुधाकर भालेराव यांना मिळू नये आसे मनोमन वाटत होते परंतु आखेर खंबीर विरोधक म्हणून माजी आमदार सुधाकर भालेराव यांची उमेदवारी अधिक्रत जाहिर होताच मतदारसंघात वेगळेच चित्र बघायला मिळत आसल्याने माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या तुतारीमुळे घडीची टिकटिक वाढल्याचे उदगीर मतदार संघातील जानकार मतदारांतून चर्चिले जात आहे.