मुखेड / प्रतिनीधी तालूक्यातील मौजे शिरूर (द.) येथील जेष्ठ लढवय्ये आंबेडकरी चळवळीतील 'तुफानातील दिवे' पुरस्कारप्राप्त पँथर चेअरमन गोविंदराव भद्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्यावर काल गावातील प्रतिष्ठित नागरीक व नातलगांच्या उपस्थितीत दु:खाश्रू नयनाने बुद्ध धम्माच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच यासोबत तालूक्यातील व जिल्हातील अभिवक्ता संघटनेचे सदस्य, पत्रकार बांधव व आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या हयातीत त्यांनी गीतगायनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक तेजेराव भद्रे यांच्या समवेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत असलेले समाजप्रबोधन केले.यांसोबत हुंडाबंदी,अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांचे विशेष योगदान आहे. संयुक्त कुटूंबाचे प्रेणेते म्हणुन त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारप्राप्त आहेत आज त्यांच्या जाण्याने तालुक्यात समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपल्या पाल्यांना साक्षरतेचे धडे देत अँड. पत्रकार व प्राध्यापक बनविले ते अँड.तथा पत्रकार नवनाथजी भद्रे व प्रा.पी.जी.भद्रे यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,जावई,नात जावई,नातू,पंतू असा मोठा परिवार आहे.