देवणीत पत्रकारांच्या वतीने दर्पणदिन मोठ्या उत्साहात साजरा
देवणी / प्रतिनीधी :

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमत्त 6 जानेवारी रोजी देवणी येथील लासोना चौकातील आप्पाजी कॉम्प्लेक्स मध्ये पुण्य नगरी पत्रकार कार्यालयात देवणी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दीननाचे औचित्य साधून कृषी प्रधान राष्ट्राचे प्रतिक आसलेल्या व्रतपत्र अॅग्रो इंडियाचे दिनदर्शिका२०२३ चे प्रकाशन करण्यात आले.


या वेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेस पार्टीचे देवणी तालुकाध्यक्ष ॲड अजितदादा बेळकोने हे होते तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश कोतवाल,सतीश बिरादार, प्रा रेवण स्वामी मळभगे,बाबासाहेब उमाटे,दत्ता पाटील,शकील मनियार, जाकिर बागवान,बालाजी कवठाळे, लक्ष्मण रणदिवे,माधवराव मुर्गे,हसन मोमीन,प्रमोद लासूने,सचिन मंगनाळे,कृष्णा पिंजरे,जयेश ढगे,आनंद अंकुलगे,विक्रम गायकवाड,आदी पत्रकार उपस्थित होते यावेळी अनेक पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले,सूत्रसंचालन पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी प्रा.रेवण स्वामी मळभगे यांनी केले तर अॅग्रो इंडियाचे संपादक बालाजी टाळीकोटे यांनी आभार मानले.