ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना गुरा-ढोराप्रमाणे वागणूक मिळत होती. कामगारांना 12-12 तास काम करावे लागत असे. एवढे कामे करून सुद्धा भारतीय कामगारांना योग्य ती वागणूक मिळत नव्हती.

ब्रिटिश काळात भारतीय कामगारांना मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती. इंग्रजांच्या आठवड्याच्या पगार नियमानुसार एका वर्षात 52 आठवडे होत असे आणि त्याप्रमाणे कामगारांना पगार मिळत असे.

इंग्रजांच्या पगार नियमानुसार चार आठवड्याचा “एक” महिना धरला असता एका वर्षात 13 पगार मिळायलाच हवे होते पण असं न होता एका वर्षात फक्त 12 पगारच मिळत असे. ही बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला पत्र व्यवहार करून ह्या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली. आणि त्यात ठणकावून सांगितले जर 13 वा पगार म्हणजे आताचा आपण ज्याला “बोनस” म्हणतो ते जर नाही मिळाले तर आंदोलन करू असाही इशारा त्या पत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारला दिला.

त्यानंतर ब्रिटिश सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्राची दखल घेत, कामगारांना 13 पगार म्हणजे आताच “बोनस” कसं देता येईल यावर विचार केला गेला, तेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारला काही सूचना दिल्या, त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सुचविले की, भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे “दिवाळी” तर 13 वा पगार म्हणजेच “बोनस” “दिवाळीला” च देण्यात यावा. त्यांच्या पत्राचा विचार करून ब्रिटिश सरकारने 30 जून 1940 साली भारतात “बोनस” हा कायदा लागू झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्याही एका जातीसाठी किंवा धर्मासाठी कार्य न करता सर्व भारतियांसाठी मोठा लढा उभारला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. जात संघर्षामध्ये भरडलेला भारत हा कामगारांच्या श्रमाशिवाय उभा राहू शकतं नाही हा त्यांचा मूळ विचार होता. आणि त्यामुळेच त्यांचे कामाचे तास किती असले पाहिजेत, त्याला सवलती किती मिळाल्या पाहिजेत त्याबाबत त्यांच्या मनात पक्का विचार होता. आणि त्याच विचारातून बोनसचा जन्म झाला. म्हणजे कुठल्या एका वर्गाचा, कुठल्या एका जातीचा, कुठल्या एका धर्माचा त्यांनी कधीच विचार केला नाही. तर भारतातील शोषित, श्रमकरी सगळ्या प्रकारातील समाजाचा त्यांनी विचार करून काम केलं. त्याच फलितच कामगारांना मिळालेला बोनस आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे आज आपल्याला दिवाळीचा “बोनस” मिळत आहे..!

ThanksDrBabasahebAmbedkar.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp