लातूर : लातूर जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या दिशा प्रतिष्ठानचा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत शस्त्रक्रियांचे आयोजन करण्यात आलं आहे. शनिवार २३ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते ०२ या वेळेत नाव नोंदणी केली जाणार असून त्यानंतर मोफत शस्त्रक्रिया सुरु होतील. या सर्व शस्त्रक्रिया लातूर शहरातील नामांकित खाजगी रुग्णालयात होणार आहेत. २४ मार्च २०२०४ पासून सुरु होणाऱ्या मोफत शस्त्रक्रियामध्ये अँजिओप्लास्टी, कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, मणक्याचे विविध आजार, ब्रेन ट्युमर आदी १००% मोफत शस्त्रक्रिया औषधांसह केल्या जाणार आहेत. तर ५० % सवलतीमध्ये कान-नाक-घसा, जनरल सर्जरी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया, हाडांच्या, डोळ्यांच्या शस्त्रकिया केल्या जाणार आहेत. रक्त तपासणी, सिटीस्कॅन आणि एमआरआय ५० टक्के सवलतीत उपलबध करून दिले जाणार आहे. या सर्व शस्त्रक्रिया लातूर शहरातील सह्याद्री हॉस्पिटल, पोद्दार हॉस्पिटल, काळे हॉस्पिटल, गोरे हॉस्पिटल, सादसुख हॉस्पिटल, सिग्मा आय हॉस्पिटल तर निलंगा येथील गणेश नेत्रालय आदी नामांकीत हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहेत.

तत्पूर्वी नाव नोंदणी अत्यावश्यक आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी गरजू रुग्णांनी शनिवार २३ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते ०२ या वेळेत नाव नोंदणी करावी लागणार आहे. नाव नोंदणीची ठिकाणं पुढीलप्रमाणे : लातूर – कोंबडे हॉस्पिटल-5 नंबर चौक, रेणापूर : देशमुख हॉस्पिटल, अहमदपूर – भाऊ हॉस्पिटल, थोडगा रोड, चाकूर – आधार हॉस्पिटल जुन्या बसस्टँड समोर, उदगीर – स्पंदन हॉस्पिटल शेल्हाळ रोड, जळकोट – रुक्मिणी हॉस्पिटल, बस डेपो जवळ, वलांडी – श्रीकृष्ण क्लिनिक दि इंडियन अर्बन बँके जवळ, निलंगा – साई हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, औसा – सह्याद्री हॉस्पिटल,, MIDC समोर आदी ठिकाणी केली जाणार आहे.

या शिबिराच्या अधिक माहितीसाठी दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले (9420438999), इसरार सगरे (9960803333) अॅड. वैशाली यादव (8369651599), जब्बार पठाण (9028348111), विष्णू धायगुडे (9673409777), अजय शहा (98908899991) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. तर या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. अशोक पोद्दार, अभिजीत देशमुख, डॉ. चेतन सारडा, डॉ. हणुमंत किनीकर, संतोष देशमुख, प्रसाद उदगीरकर, किशोर भुजबळ, रतन बिंदादा, अविनाश कामदार, प्रसाद जोशी, महेश मालपाणी, पप्पु घोलप यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp