
मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून नाही मिळाल्यास निवडणुकी समोर जावे — मनोज दादा जरांगे पाटील
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहरात मनोज दादा जरांगे पाटील जंगी स्वागत माणिकराव धनुरे मंगल कार्यालयात संघर्ष योद्धा यांची संवाद बैठक संपन्न माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी देवणी तालुक्यातील ज्या आंदोलनाकावर गुन्हे दाखल झाले त्यांच्या हस्ते सत्कार प्रशांत पाटील दवणहिप्परगा,प्रा,अनिल इंगोले, राजाराम पाटील, मलबा घोणसे, धनराज बिरादार,पत्रकार राहुल भीमराव बालुरे, ज्ञानेश्वर शेंडगे, नामदेव मुराळे, संदीप पाटील, कृष्णा इंगोले, किशोर बिरादार, संदीप गुरणाळे,व चिमुगले याचा हि मनोज हस्ते सत्कार करण्यात आला वनमाला बिरादार, दिव्या,नमता हुसळणाळे, मयुरी कोयले, अनुष्षा मुराळे, यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मनोज दादा जरांगे पाटील यांनी बोलताना म्हणाले की होऊ घातलेल्या निवडणुका आमच्या आरक्षण जोपर्यंत देणार नाहीत तोपर्यंत आम्ही ओबीसीतून संरक्षण घेतल्याशिवाय गप बसणार नाही असा टोला लगावला तुम्ही मतदान कोणाला करा आमचं देणंघेणं नाही पण आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असे बोलताना व्यक्त केले तसेच लिंगायत समाजाचा पाठिंबा, मुस्लिम समाजाचा पाठिंबा या संवाद बैठकीत देण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधव व इतर बहुजन सर्व घटकातील समाज मोठ्या प्रमाणे उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज बिरादार व आभार प्रा,अनिल इंगोले यांनी मांडले पत्रकार बांधव पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता संवाद बैठक राष्ट्रगीताने संपन्न झाली