ग्रामीण महिला विकास संस्था, देवणी, जि. लातूर आयोजित निर्धार समानतेचा प्रकल्प शुभांरभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

ग्रामीण महिला विकास संस्था (देवणी) मार्फत लिंग आधारित भेदभाव, बालविवाह प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचार, हुंडा प्रथा निर्मुलन, मुलींचे शिक्षण, आरोग्य इ. विषयांवर विविध गावांमधून जनजागृतीचे कार्यक्रम / उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून लिंगभावाविषयी तरुण मुले/मुली, महिला व पुरुष यांचा सकारात्मक समानतेचा दृष्टीकोन तयार करण्याच्या हेतुने देवणी तालुक्यातील २० गावांमधून ‘निर्धार समानतेचा’ या प्रकल्पाचे कार्य सुरू करण्यात येत आहे. युरोपीयन युनियन व स्विस एड इंडिया यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पाच्या शुभारंभाचा कार्यक्रम मंगळवार, दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते,
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सोपानरावजी अकेले गटविकास अधिकारी, पंचायत समिती, देवणी, प्रमुख पाहुणे मा सौ. सुवर्णा दुरुगकर प्रकल्प अधिकारी, महिला व बालविकास, पं.स., देवणी, मा, अॕड सुमेधा शिंदे पॕनल सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर, मा. श्री. सदाशिवरावजी पाटील तळेगावकर अध्यक्ष, तालुका सरपंच संघटना, देवणी, मारोतीरावजी भोसले
अध्यक्ष, पोलीस पाटील संघटना, देवणी मा. श्री. विष्णुकांतजी गुट्टे पोलीस निरीक्षक, पो.स्टे. देवणी
मा. प्रा. डॉ. शुभांगी पांचाळ
समन्वयक, लिगल एड क्लिनिक, दयानंद विधी महाविद्यालय, लातूर,
मा. श्री. नसीर शेख संरक्षण अधिकारी, देवणी मा. श्री. रमेश कोतवाल अध्यक्ष, तालुका पत्रकार संघ, देवणी,
मा. अॕड. सुजाता माने सामाजिक कार्यकर्ती, लातूर अच्युत बोरगावकर, मिर्झा एम डब्ल्यू, कुशावर्ता बेळ्ळे अध्यक्षा ग्रामीण महिला विकास संस्था देवणी, कचराताई गायकवाड प्रकल्प सहा, समन्वयक,गिरीष सबनीस प्रकल्प. सहा समन्वयक, प्रेरणा जाधव समुपदेशक.तसेच, नागनाथ सुर्यवंशी,कृष्णा इंगोले, सत्यशिला सरवदे, विजयश्री बोचरे, विकास बिरादार, सरोजा शिंदे, सुखवास इसाळे, पोलीस पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती, सरपंच युवक, युवती, विस गावातील प्रेरक प्ररिका मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा इंगोले,व आभार गिरीश सबनीस यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp