देवणीत जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा संपन्न
शालुकाआई प्रतिष्ठाणच्या वतीने शेंद्रीय शेतीसाठी स्तुत्य उपक्रम

देवणी / प्रतिनिधी : नैशनल प्रोग्राम फौर औरगैनिक प्रोडक्शन च्या अंतर्गत विषमुक्त शेती विषमुक्त अन्न अभियानाच्या माध्यमातून काळी आई वाचवा उपक्रमाचा एक भाग म्हणून येथील धनूरे मंगल कार्यालयात रविवारी (ता.02) सकाळी 11.45 वा दिप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजनाने शालुकाआई प्रतिष्ठाणच्या वतीने जिल्हा स्तरीय शेतकरी मेळाव्याचे उद्धघाटन करण्यात आले. सदर शेतकरी मेळाव्यात शेंद्रीय शेती काळाची गरज या विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.
या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील तात्यासाहेब इंगळे हे उपस्थीत होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी आधिकारी एस.आर.पाटील, निजाम शेख,आत्माचे तालुका व्यवस्थापक राहुल जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितीत उद्धघाटक म्हणून देवणी मार्केट कमिटीचे माजी सभापती गोविंदराव भोपणीकर ,शेतकरी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे,माजी महिला बालकल्याण सभापती कुशावर्ताताई बेळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, देवर्जन चे सरपंच अभिजीत साकोळकर, जेष्ठ पत्रकार मनोज पाटील, शाम जाधव ईरशाद शेख,नागनाथ गडिमे,बालाजी तोंडारे, शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी ओमकार मस्कले, प्रयोगशील शेतकरी कल्याण धनूरे आत्माचे श्रीनामे मैडम,सुभाष बिरादार,उमाकांतशेट्टे शेतकरी नेते आनंद जिवणे आदींची उपस्थिती.
या वेळी नैसर्गिक व शेंद्रीय करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. सदर शेतकऱ्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालुकाआई
प्रतिष्ठाणचे पदाधिकारी बालाजी टाळीकोटे ,जाकीर बागवान, सचिन मंगनाळे,ज्ञानेश्वरभाऊ सुर्यवंशी,इश्वर सुर्यवंशी,शादुल बौडीवाले,शिवशंकर जिवणे,सय्यदअल्ली शेख,अमजद शेख,कमलाकर म्हैत्रे,,वनमाला भंडे , संध्या पाटील,रणदिवे लक्ष्मण,रणदिवे सरोजा,लता गायकवाड, नागमा पटवारी,भाग्यश्री कावर,गंगाधर कावर,जनाबाई भुगे,छाया दगडे, गरिबे विश्वनाथ, शंकर गरिबे,ज्ञानोबा सुर्यवंशी, सुनिता हैबतपुरे,दशरथ कांबळे आदींनी परिश्रम घेतले.




