देवणीत बंदला संमिश्र प्रतिसाद
देवणी, ता. ११ (बातमीदार ) : लखीमपूर खीरी येथे शेतकरी आंदोनलनाला दहशतीने चिरडून टाकणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीसह इतर संघटनांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सोमवारी (ता. ११) देवणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
या बंदमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, व इतर सामाजिक व शेतकरी संटनांचे पदाधिकारी संपूर्ण शहरात रैली काढून व्यापाऱ्यांचे आस्थापना बंद ठेवण्यात आले.त्याचबरोबर एस.टी.बसेस ही बंद ठेवण्यात आले. सदर बंद शांततेत पार पाडण्यात आला आसून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. सदर बंदची रैली बोरोळ चौक येथे येऊन लखीमपूर खीरी येथे घडलेल्या नरसंहाराचा तिव्र शब्दात प्रतिक्रिया देत देवणी बंदचा समारोप करण्यात आला. बंद दरम्यान अनूचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या वेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऐड.अजित बेळकोणे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.अनिल इंगोले,शहराध्यक्ष अमरनाथ मुर्के,काशीनाथ मानकरी,बालाजी वळसांगवीकर,अमर बोरे,लक्ष्मण रणदिवे, जावेद येरोळे, प्रणव बिरादार, देविदास पतंगे, तांबोळी जावेद, महादेव मळभागे, रसिद मल्लेवाले, शेख फयाज, सचिन काळे, प्रताप कोयले, बोरकर जितेंद्र, शेख रियाज, मनियार सत्तार, सय्यद सोहेल, मुनाफ मनियार, पांडुरंग कदम, बालाजी पतंगे, शिवाजी कांबळे, योगेश जाधव, संताजी पाटील बामणीकर, बालाजी बिरादार, माधव तळेगावकर, सुभाष बिरादार, महेश गंगणे, आत्तार इलाही, सोमनाथ रावळे, अहमद शादुल, अशोक गंगणे, लक्ष्मण कल्याणकर आदींची उपस्थिती होती.