
देवणी येथे बसवेश्वर जयंती निमित्त विविध कार्यक्रम
देवणी : येथे जग ज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीकडून यंदाही दि.२२ एप्रिल ते २४ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये शनिवारी दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता श्री गुरु लिंगेश्वर विरक्त मठामध्ये म.नि.प्र. सिद्धलिंग महास्वामीजी देवणी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन मल्लिकार्जुन मानकरी व सीएम बिराजदार गुरुजी यांच्या हस्ते होणार या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ कीर्तीताई घोरपडे तहसीलदार
सुरेश घोळवे,देवणी, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे आदींची उपस्थिती राहणार आहे.
सकाळी १० वाजता श्री महादेव मंदिर येथून मोटरसायकल
रॅली निघणार असून या मोटर सायकल रॅलीला नगरसेवक नागेश जीवणे, किशोर निडवंचे हे झेंडा दाखवणार आहेत. तर या रॅलीचे समारोप श्री गुरु लिंगेश्वर विरक्त मठात होणार आहे. यानंतर सायंकाळी ५ वाजता श्री महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा श्री गुरुलिंगेश्वर वीरक्त मठामध्ये वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळी यांच्याकडून संपन्न होणार आहे.
रविवारी दि.२३ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटक आशोक लुल्ले व कल्याण धनुरे राहणार असून या रक्तदान शिबिराचे प्रमुख म्हणून गुंडाप्पा कंटे व शैलेश धनूरे हे कार्य पाहणार आहेत .तर सोमवारी दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्री बसवेश्वर प्रतिमेचे भव्य मिरवणूक श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठापासून शहराच्या प्रमुख मार्गावरून
ही मिरवणूक निघणार आहे.
या मिरवणुकीच्या वेळी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सिद्धलिंग महास्वामीजी , हावगीराव पाटील, दिलीप पाटील नागराळकर ,शेषराव मानकरी, माणिकराव लांडगे, वैजनाथ अस्टुरे , बसवराज पाटील, यशवंत पाटील, मल्लिकार्जुन डोंगरे आदींच्या हस्ते या प्रतिमेचे पूजन होणार आहे.
तर ही मिरवणूक बाबुराव लांडगे, अमित मानकरी, रमेश मंसूरे, विजयकुमार लुल्ले ,अमर पाटील, सोमनाथ कुडते, गणेश बोंद्रे ,मनोज लांडगे, विजयकुमार कोरे, महादेव लद्दे ,संगमेश ढगे ,सुभाष टेंकाळे, शिवानंद मिर्झापुरे ,महेश धनुरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या सर्व बसवेश्वर जयंती निमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे लाभ घ्यावे असे आवाहन महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरज अंबुलगे सचिव प्रीतम अस्टुरे यांनी केले आहेत.