देवणीत मराठा आरक्षणप्रश्नी कडकडीत बंद
भर पावसातही आंदोलनकर्त्यांनी केले आंदोलन .


देवणी / प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ देवणी तालुका सकल मराठा बांधव आणि विविध संघटनेच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.सोमवारी भर पावसातही आंदोलनकर्त्यांनी कडकडीत बंद यशस्वी केला.
गेल्या दोन दिवसापूर्वी सोमवारी देवणी बंदची हाक आयोजकांनी दिली होती. सोमवारी झालेल्या बंदमध्ये शहरातील सर्व बाजारपेठ व व्यापार बंद ठेवण्यात आला, तसेच शैक्षणिक संस्थाही बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या. याशिवाय नियमित चालणारे बससेवा व वाहतूक सेवा पण पूर्ण बंद होती.
बंदमध्ये तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधव एकवटला होता. सर्व समाज बांधव आणि इतर समाज बांधवांनी व विविध राजकीय सामाजिक संघटनाने या बंदमध्ये सहभाग नोंदवत आपला पाठिंबा दर्शविला .सकाळी शहरातून रॅली काढण्यात येऊन येथील निलंगा चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. समारोपप्रसंगी अनेक मान्यवर आणि व कार्यकर्त्यांनी सदरील घटनेचा निषेध व्यक्त करत मराठा समाजाला आता आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. आरक्षण मिळाल्याशिवाय समाज बांधव शांत बसणार नाहीत अशी भीष्मप्रतिज्ञापन समाजबांधवांनी केली.
पोलीस प्रशासनातर्फे चौकाचौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp