

रसिका शैक्षणिक संकुलाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
देवणी
जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी द्वारा संचलित रसिका शैक्षणिक संकुलाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. मा. श्री दिलीपरावजी देशमुख साहेब (माजी मंत्री, क्रीडा व युवक कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. आ. श्री. राजेशभैय्या टोपे साहेब, माजी राज्यमंत्री मा. श्री बाळासाहेब जाधव, नांदेडचे खासदार मा. श्री. वसंतराव चव्हाण साहेब, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे साहेब, मा. श्री अशोकराव पाटील निलंगेकर(प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक नाना भिसे, मुखेडचे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास देवणी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गोविंदराव भोपणीकर व संस्थासचिव श्री. गजानन भोपणीकर यांनी केले आहे.