
लातूर जिल्ह्यातील राजकीय वळूना शह देण्यासाठी देवणीतील सर्वपक्षीय वळू आक्रमक 【कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा देवणीत सर्वपक्षीय निषेध】
देवणी : जातीच्या गाय व वळू यांचे गोवंश संशोधन केंद्र विद्यमान कृषिमंत्री मराठवाड्यातील मंत्री मंडळाच्या बैठकीत ठराव पास करून घेऊन देवणी साठी मागणी असलेले गोवंश संशोधन केंद्र परळीला पळविले आहे या बैठकीत राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी एक शब्द ही विरोध केला नाही देवणी जातीची प्रतिष्ठा व अस्मिता असलेले देवणी जातीच्या वळू व गाय यांचे गो संशोधन करणारे केंद्र परळीला पळविले भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रुपला खुश ठेवण्यासाठी देवणी लोकांच्या प्रतिष्ठेचे असलेले देवणी जातीची देश पातळीरील ओळख पुसली जावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूड बुद्धीने देवणी जातीचे गोवंश संशोधन केंद्र धनंजय मुंडे यांना भेट म्हणून दिली ही बातमी वाऱ्यासारखी देवणी तालुक्यातील गोवंश पालक व शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचली
लातूर जिल्ह्यातील राजकीय वळूना शह देण्यासाठी आत्ता देवणी तालुक्यातील सर्व पक्षीय वळू आता पुढे सरसावले आहेत राज्य शासनाने मराठवाड्यातील बैठकीत लातूर जिल्ह्यातील आमदार नसले तरी उदगीर तालुका मतदारसंघाचे विद्यमान आमदार सध्याचे कॅबिनेट मंत्री बैठकीत असतांना मूग गिळून का बसले हे न सुटणारे कोडे आहे देवणी हे गाव उदगीर तालुक्यात असलेले विद्यमान कॅबिनेट मंत्री यांना माहिती नसावं संजय बनसोडे केवळ उदगीर मतदारसंघाचे मंत्री आहेत देवणीचे नाहीत देवणी प्रश्नाबद्दल मौन पाळल्याबद्दल तमाम देवणी तालुक्यातील सर्वपक्षीयाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

देवणी जातीची पैदास ही देवणी तालुक्यात आहे त्यांच्या नावातच देवणी असल्याने देवणी तालुक्यातील गोवंश पालकांची ही मक्तेदारी आहे ह्या देवणी जातीवर पहिला अधिकार देवणी कराचा असणार आहे त्यामुळे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख प्रत्येक ठिकाणी आवर्जून सांगायचे लातूरचे पोरं व देवणीचे गोर कधीही पुढचं राहणार माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गोवंश गोपालकाना गोपालन करण्यात प्रोत्साहित करून त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून यात्रेच्या माध्यमातून अनेक गोपालकाना विविध प्रकारचे बक्षिसे देऊन त्यांना राजाश्रय दिला होता देवणी ही कायमस्वरूपी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारेखाली राहिली आहे गोपीनाथ राव मुंडे यांचा कार्यकाळ देवणी तालुक्याच्या सानिध्यात गेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवी संघात असताना देवणी तील सर्वच वाटा त्यांनी झिजविल्या आहेत गोपीनाथ राव मुंडे हे सत्तेत आले असताना देवणी चे ऋण परतफेड करण्यासाठी तालुका दिला तर पुतण्या धनंजय मुंडे सत्तेत येताच देवणीचं वैभवचं पळवून घेऊन जाण्याचे महान कार्य करून त्यांनी देवणी कराच्या साक्षीने खरी श्रद्धांजली वाहिली असेच म्हणावे लागेल यांचा बदला घेण्यासाठी देवणीकर आत्ता बीड जिल्ह्यात येतील यात शंका नाही देवणी गोवंश ही देवणी कारांची खाजगी मालमत्ता आहे या जातीचे संशोधन करणं देवणी कराच कर्तव्य व जबाबदारी आहे त्यामुळे संशोधन केंद्र देवणी कराच्या हक्काची मागणी आहे ते देवणीकराना मिळणे अपेक्षित आहे त्यामुळे राजकारणातील वळूची वळवळ थांबविल्याशिवाय देवणीला संशोधन केंद्र मिळणार नाही त्यामुळे देवणी तील सर्वपक्षीय वळू पुढे सरसावले आहेत मागून मिळत नसेल तर शासनाच्या मानगटीवर बसवून हिसकावून घेऊ अशी देवणी तालुक्यातील आंदोलकांची तयारी आहे

– गिरीधर गायकवाड