देवणी / प्रतिनिधी : सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा (जन्म ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.त्यांना
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.
सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरूवातीच्या शाळांपैकी एक होती.
देवणी येथील महावितरण उपविभागीय कार्यालयात ३ जानेवारी रोजी सावीञीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून 191 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी
महावितरण कार्यालयातील लीपीक श्रीमती कानाडे आर एस,प्रधान तञंज्ञ घटकार डी जी, पञकार शकिल मनियार,कृष्णा वजनम,के जी सतनुरे,परीट ए व्हि,भद्रशेट्टे एस एस,स्वामी के पी,वाडकर एस ए,नंदु कांबळे,बि जी भंडे सुरक्षा रक्षक ,अदि उपस्थित होते
