देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी येथील मार्केट कमिटीला पणन महामंडळाच्या पॅनल वरिल इंजिनीयर के.वी .अमृतवाड यांनी भेट दिली व भेटी अंती मार्केट कमिटी च्या जागेची पाहणी केली मार्केट कमिटी च्या विकासासाठी भुई काटा. मार्केट वाढवण्यासाठी नवीन गाळे व तसेच शेतकऱ्यांच्या निवासाच्या जागेची पाहणी केली व आपल्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचे दिले आश्वासन इत्यादी विकास कामाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी मार्केट कमिटीच्या वतीने साहेबांचा सत्कार करण्यात आला मार्केट कमिटीचे संचालक प्रा ,डॉ अनिल वैजनाथराव इंगोले तालुकाध्यक्ष ,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी देवणी तालुका उपाध्यक्ष गफूर खुरेशी, मार्केट कमिटीचे सचिव सुनील कळसे. खुद्द खुदमपुरे, संचालक इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp