देवणी खुर्द ते, आंबेगाव नकाशावरील दिड कि,लो,मि,रस्ता खुला करण्यात आले कै, धरमगिर गिरी मा, चेअरमन यांचे स्वप्न पूर्ण,
आंबेगाव रोड लगत पाचशे मीटर उध्दव कुमदाळे यांच्या शेतापर्यंत स्वता, शेतकरी मिळुन स्वताच्या खर्चाने रस्ता तयार केले,
देवणी बु,शिवरातुन ते बोरोळ साठवण तलापर्यंत शिव रस्ता तिन कि, लो, मिटर तयार करण्यात आले,
या तिन्ही रस्ताना प्रशासनाचे सहकार्य लाभले आहे,
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी शेतात पिकविलेले धान्य सरळ बाजार पेठेत घेऊन जाता यावे ,भाऊ बंधकीतील आपसातील वाद आपसात मिटावे ,हे वाद न्यायप्रविष्ट होऊन वेळ व पैसा वाया जाऊ नये असा उदात्य हेतू ठेवून जिल्ह्यातील सर्व रस्ते १ मे २०२३ पर्यंत अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेशीत करण्यात आले होते त्याच अनुशंगाने देवणी तालुक्यातील सद्या नकाशावर असलेले रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे काम मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे
असून देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथील नकाशावर असलेला वर्षेनुवर्षे शिवरस्ता वहिवाट रस्ताचे काम रखडले होते अतिक्रमण मुक्त करण्यास देवणीच्या तहसीलदार सुरेश घोळवे, मंडळाधिकारी श्रीमती अनिता ढगे,तलाठी कुंभार धनाजी,सरपंच यशवंत कांबळे,उपसंरपच विठ्ठल शिंगडे ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, पत्रकार बांधव व शेतकरी बांधव एकत्र येऊन सर्वाच्या सहकार्यने शिवरस्ता वहिवाट नकाशावर असलेल्याने सर्वाच्या सहकार्याने रस्ता खुला करण्याचे यश मिळाले आहे, तसेच आंबेगाव ते देवणी येणगेवाडी आंबेगाव रस्ता पासून सर्वे नंबर ४९/४ मध्ये, व सर्वे नंबर ५०/६ मधिल शेतकरी स्वता रोड करिता शेतकरी समिती देवुन आपल्या शेतीसाठी जाण्यासाठी आपल्या स्वखर्चातून शेतीसाठी रस्ता तयार करण्यात आला या रस्ताचे उद्घाटन देवणी खुर्द सज्जाचे तलाठी कुंभार धनाजी यांच्या हस्ते करण्यात आले होते, शेतकरी लक्ष्मण जेढुरे, ललिताबाई कुंभार, पांडुरंग जेढुरे, उध्दव कुमदाळे, यांच्या शेतापर्यंत पाचशे मीटर पर्यंत रस्ता तयार करण्यात आले,१ देवणी बु शिवरस्तातुन बोरोळ साठवण तलावपर्यंत तिन कि, लो, मिटर रस्ताचे उद्घाटन तहसीलदार सुरेश घोळवे, व शेतकरी बांधव होते,२ देवणी खुर्द ते आंबेगाव नकाशावरील शिवरस्ता दिड कि,लो, मिटर रस्ताचे कामाचे उद्घाटन मा,श्री, सुरेश घोळवे तहसीलदार साहेब यांनी केले होते, या रस्त्याच्या कामासाठी कै, धरमगिर गिरी मा, चेअरमन यांचे अधुरे स्वप्न पूर्ण केले व सर्व शेतकऱ्यांनीही मेहनत घेऊन रस्ता खुला करून घेण्यासाठी प्रयत्न केले आहे, तरी सर्व प्रशासकीय यंत्रनेचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे,
