देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

ग्रामीण महिला विकास संस्था देवणी व यूरोपीयन युनियन आणि स्वीसएड पुणे यांच्या वतीने देवणी तालुक्यातील वीस गावातून बालविवाह मुक्त अभियाला सुरुवात करण्यात आली.
अभियानाच्या माध्यमातून देवणी खुर्द येथे दि, २२/११/२०२३ रोजी बुधवारी महिला, पुरुष,युवक ,युवती,गटातील महिला रॕली व सभेत मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाचे सुरूवात शिवाजी चौक ते ग्रामपंचायत कार्यालया समोर कार्यक्रम घेण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच यशंवत कांबळे, प्रमुख राजाराम पाटील,नरवटे केशव,अनिल कांबळे,रतन गरड,संजय गरड, माधव रणदिवे,छान मुराळे,ज्योतिबा पाटील,दैवशाला कांबळे,सोनाली रणदिवे, सरोजा गायकवाड,सत्यकला रणदिवे,शोभा रणदिवे,प्रभू काकनाळे, विजयकुमार पाटील,श्रीशांत माकने,तुकाराम हन्डे,भरत गिरी,प्रकाश मेह्त्रे,ग्रामीण महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा कुशावर्ता बेळे, गिरीश सबनीस,कचराताई गायकवाड,नागनाथ सुर्यवंशी, विकास बिरादार,सरोजा शिंदे,सत्यशिला सरवदे,कृष्णा इंगोले,विजयश्री बोचरे,प्रेरणा जाधव, सुखवास इसाळे,कला पथक सुधाकर गायकवाड,विष्णुकांता गायकवाड, मेघा बिरादार,प्रेरक लक्ष्मण रणदिवे, प्रेरिका मनिषा बिरादार,मोठ्या संख्येने उपस्थित होते, ग्रामसेवक गावातील सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी ताई, आशा ताई,ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.यात भिंती लेखन,पोस्टर प्रदर्शन,जाहीर मेळावे,कॉर्नर बैठका,युवकांसाठी सेल्फी पॉईंट,जनजागृती रथ,रॅली, ग्रहभेटी, गायन पथनाट्य यांच्या माध्यमातून बालविवाह मुक्त गाव करण्यासाठी बालविवाहाची कारणे, उपाय,परिणाम,कायदे याविषयी जनजागृती करण्यात आली.अभियानाची सुरुवात करण्या अगोदर ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक घेऊन त्यांच्या बाल विवाह रोखण्याच्या संदर्भात त्यांचा भूमिका, जबाबदाऱ्या याविषयी चर्चा करण्यात आली यात तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी,ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडीताई,पोलीस पाटील,मुख्याध्यापक यांचा सक्रिय सहभाग मोठा होता,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp