देवणीचे सुपुत्र तथा उदगीर नगरीचे राजकीय विश्लेशक, कार्टूनीस्ट, पत्रकार कै. विनोद मिंचे यांचे दि.19 रोजी आकस्मित निधन झाले. याबद्दल देवणी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दि.22 रोजी बोरोळ चौकात सायं 5.00वा. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दैनिक राजनेता चे संपादक यानी आपल्या कारकिर्दीची सुरूवात दैनिक एकमत मधे कार्टूनीस्ट म्हणून सुरूवात केली. पुढे येथेच उदगीर तालूका प्रतिनिधी म्हणून कार्य केले. यानंतर स्वताःचे राजनेता या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र सुरू कले. यातून आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात नावारुपास आले. त्यांच्या या अचानक जाण्याने जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.या देवणीच्या भुमिपुत्रास
देवणी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मौन बाळगुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी पत्रकार संघाचे सचिव प्रा.वैजनाथ साबणे, मनोज पाटील, शकील मणीयार, प्रा.नरसिंग सुर्यवंशी आनंदवाडीकर, बालाजी टाळीकोटे, लक्ष्मण रणदिवे, जाकीर बागवान,भैय्यासाहेब देवणीकर, दिलीप शिंदे आदी पत्रकार बांधवांसह,सोमनाथ लद्दे,स्वप्निल बावगे, बालाजी सुर्यवंशी, रणजित मुळे, प्रसाद कोतवाल, रोहित बंडगर,संदिप मंगलगे,उत्तम रणदिवे, महादेव बेलुरे, महादेव बिरादार, उमाकांत बरगे, विजयकुमार येड्डे,दत्तात्रेय वासगे आदी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
