नेटच्या असुविधेमुळे शेतकरी तासनतास ताटकळत बसत आहेत
देवणी खुर्द सह तालुक्यात असा प्रकार घडत आहे
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी महाराष्ट्र शासनाच्या १४ ऑक्टोबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात अॅग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतक-यांच्या नोंदणीस देवणी तालुक्यात गावांमध्ये सुरुवात करण्यात आली. तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित राहून यामध्ये नोंदणीस सुरुवात झाली आहे.या योजनेमध्ये नोंदणीसाठी तलावाकडील अॅग्रीस्टॅक अॅप्लीकेशनमध्ये अधिकार अभिलेखाबाबत शेतीच्या मालकी हक्काबाबत डाटा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी आधार क्रमांक व आधाराशी जोडलेला मोबाईल क्रमांक घेवून तलाठ्यांशी संपर्क करावा. तलाठी अँग्रीस्टॅक अप्लीकेशनमध्ये आवश्यक माहितीभरून पडताळणी द्वारे माहिती जतन करतील. त्यानंतर कृषी सहाय्यक त्या माहिती आधारे शेतकऱ्यांची संमती घेवून पडताळणी करून त्याच्यासाठी विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याची कार्यवाही करणार आहे.
सदर माहितीचा उपयोग भविष्यात शेतकऱ्यांच्या साठी राबवण्यात विविध कल्याणकारी योजना, शेती- मालाचे खरेदी धोरण आदी योजनांसाठी केला जाणार आहे. कृषी सहाय्यक त्या माहिती आधारे शेतकऱ्यांची संमती घेवून पडताळणी केली जाणार आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावाच्या सज्जा तलाठी कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा, देवणी खु सज्जाचे तलाठी धनराज भंडारे यांच्याशी संपर्क केला असता नेटच्या तांत्रिक अडचणीमुळे ही योजना राबविण्यास विलंब होत आहे कारण ग्रामीण भागामध्ये नेटचे अडचण होत असल्यामुळे शेतकरी तासनतास बसून राहत आहेत व शेतकऱ्यांच्या अडचण पाहून तारीख वाढवावी मानवी हक्क अभियान संघटनेच्या लातूर जिल्ह्याच्या वतीने देवणी मानवी हक्क अभियान संघटनेचे देवणी तालुकाध्यक्ष गजानन गायकवाड शेतकऱ्याची बाजू माडली आहे असे देवणी प्रतिनिधी बोलताना सांगितले