लातूर जिल्ह्याचा सिमावर्तीभाग बनतोय “अवैध” धंद्याचा पैटर्न


अवैध गुटखा व तंबाखूची तस्करी करणाऱ्यावर जवळगा येथे मोठी कार्यवाई
1लाख 62हजार600 रुपयेचा मुद्देमाल जप्त पोलीस कर्मचारी
देविदास किवंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
देवणी / प्रतिनिधी :दि: 7 नोव्हें. संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घातलेला विमल पानमसाला,गुटखा व तंबाखू अवैध मार्गाने करून तस्करी विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेल्या मोटार सायकल धारकावर बुधवार दि.६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जवळगा ता.देवणी येथील शिवाजी चौकात अडवून देवणी पोलिसांनी चाकूर तालुक्यातील आटोळा येथील एकास ताब्यात घेत१लाख ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त केलाअसूनआरोपी विरोधात भारतीय न्याय संहीता वअन्नसुरक्षा मानके कायदा २००६ कलम५९नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास देवणी पोलिसास एक मोटार सायकल धारक दुचाकी क्रमांक एम.एच.२४ बी.एम.८५१२वरून पानमसाल्याची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहीती मिळाली होती.
त्यामुळे जवळगा ता.देवणी येथील शिवाजी चौकातील मुख्य रस्त्यावर पोलिसांनी त्यास अडवत तपासणी केली असता त्यामध्ये ४९ हजार९२०रूपयाचा विमल पान मसाला,१० हजार९२०रूपयाची व्ही-१ तंबाखू,४ हजार ९६० रूपयाची रत्ना छाप तंबाखू ,१६ हजार ८००रूपयाचा बाबा नवरत्न पान मसाला आढळून आला.तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ८० हजार रूपयांची होन्डा शाईन कंपनीची मोटार सायकल असा एकूण १ लाख ६२ हजार ६०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिस कर्मचारी देविदास ज्ञानोबा किवंडे यांच्या फिर्यादी वरून आरोपी मल्लिकार्जुन रंगनाथ शेटे (वय ४२) रा.आटोळा ता.चाकूर याच्या विरोधात देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वऱ्हाडे जी.बी
यु.डी.शेटकार, देवीदास किवंडे यांनी सहभाग घेतला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोंड करित आहेत कर्नाटकच्या सिमावर्ती भागातून महाराष्ट्रामध्ये चोरट्या मार्गाने आणल्या जाणाऱ्या प्रतिबंधीत गुटखा, पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्यावर देवणी पोलिसांनी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत आचारसंहिता जाहीर झाल्यापासून २५ लाखांहून अधिक रूपयाचा प्रतिबंधित गुटखा पानमसाला देशीदारूचा मुद्देमाल जप्त केला आहे.
देवणी तालुका हा सीमावर्ती तालुका असून या तालुक्याला महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्रप्रदेश यांच्या सीमा अगदी हाकेच्या अंतरावर आहेत सध्या महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे कर्नाटक राज्यात गुटखा यांच्यावर बंदी नसल्याने कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटखायची तस्करी होत असते त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके हे अवैध मार्गाने होणाऱ्या धंद्यावर करडी नजर ठेऊन आहेत सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आदर्श आचार संहिता लागू केली आहे ह्या निवडणुका अगदी खेळी मेळीच्या वाता वरणात पार पडाव्या काही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्थाआबाधित राहावी यासाठी आपली पोलीस यंत्रणा सज्ज ठेवलीआहे अवैधधंदे करणाऱ्याना सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी सळो की पळो करून सोडले आहे विधानसभा निवडणूक लागल्या पासून आज तागायत 25 लाखाहून अधिक रुपयेचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला देशी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामुळे अवैध धंदे वाल्याचे धाबे दनाणले आसले तरी अवैध धंदेवाल्यांची अवैध धंदे करण्यासाठी दिवसेंदिवस हिम्मत का वाढतेय याचे उत्तर मात्र मिळायला तयार नाही.