देवणी तालुक्यात दारू बंदी गुन्ह्यात सापडलेल्या 3,58,750 रु किमतीच्या दारू मुद्देमालाचा पंचासक्षम नाश.
देवणी / प्रतिनिधी :
देवणी तालुक्यातील विविध गावात दारू बंदीत सापडलेल्या मुद्देमालाचा देवणी पोलीस ठाण्यात पंचासक्षम नाश करण्यात आला.या संदर्भात अधिक माहिती अशी की देवणी येथील एकूण 75 दारूबंदी गुन्ह्याचा किंमत 3,58,750 रु चा मुद्देमाल दि १९ गुरुवार रोजी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर , अप्पर पोलीस अधीक्षक मा.डॉ. अजय देवरे लातूर व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कट्टेकर निलंगा यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यमान कोर्टाची परवानगी घेऊन व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क साहेब लातूर यांच्या परवानगीने पोलीस ठाणे देवणी येथे मुद्देमालाचा पंचासमक्ष नाश करण्यात आला.सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे ,सपोनि कत्ते पोलीस ठाणे देवणी व राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रमेश चाटे,पोउपनी काळे, उदगीर पोह /1392 प्रशांत स्वामी (मोहरील),ASI शिवगुंडे, कोंडामंगले,पोह/120 उस्तूर्गे, पोह424 कलवले,पोह 1397 बनाळे,मपोशी/781 राठोड पोलीस ठाणे देवणी यांनी केली आहे.