देवणी प्रतिनिधी
देवणी नगरपंचायत मध्ये दिनांक २०/८/ २१ रोजी सौ ,श्रीदेवी प्रशांत शिंदे वय २८ वर्ष या बेघर स्त्रीने चलन ५१० रुपये भरले असून त्यांनी नगरपंचायतीमध्ये रितसर अर्ज करून सुद्धा या महिलेला न्याय मिळत नाही परंतु या महिलेने सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा, रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे जाऊन आपले म्हणणे मांडून दि २७/३/२०२१ रोजी तात्काळ कारवाईचे बेघर घरांचे पत्र देण्यात आले ,तसेच मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांचे पत्र दिनांक २३/०/८/२०२१ लातूर यांनी कार्यालयातून उद्देशून श्रीदेवी प्रशांत शिंदे यांना घर किंवा शासकीय जमीन मिळणे बाबत कळून त्यासोबत मा, जिल्हाधिकारी लातूर व सन्मा,सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार यांचे पत्र संलग्न करण्यात आले आहे तरी सदर विषय पंचायत समिती देवणी पत्र देण्यात आले, केंद्रीय मंत्रीच्या पत्रात नमूद केल्या केल्याप्रमाणे श्रीदेवी प्रशांत शिंदे राहणार महात्मा फुले नगर तालुका देवनी जिल्हा लातूर येथे भाडेतत्त्वावर राहात आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांचे सदर ठिकाणी स्वमालकीचे घर नाही आर्थिक अडचण असल्याने घर खरेदी करणे त्यांना शक्य होत नसल्याने भाडेतत्त्वावर राहण्याचा अनेक अडचणी समोर जावे लागत आहे, त्यामुळे त्यांना सदर ठिकाणी जर किंवा शासकीय जमीन मिळाल्यास निवाऱ्याची सोय होईल सदर बाबत त्यांनी संबंधित कार्यालयात अर्ज विनंती केली असून देखील अद्याप पर्यंत त्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यांना घर नाही बेघर आहेत त्वरित त्यांना जागा उपलब्ध करून देऊन त्यांना घर देण्यात यावे परंतु त्या महिलेचे जीवन उघड्यावर निवारा कुटुंब लहान बालके रस्त्यावरती असून सुद्धा त्याकडे कोणाचेही लक्ष दिसत नाहीत म्हणून जर मला न्याय मिळत नसेल तर मी माझ्या कुटुंबासह मी उपोषण करणार आहे तरी माझ्या बेघर घराकडे शासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे,