खास बातमी विशेष बातमी..
देवणी नगरपंचायतीसाठी ७१.५५ टक्के मतदान झाले
तर तीन ग्रा.प.साठी ७५.७९% मतदान झाले.
देवणी, ता.२१ (बातमीदार) देवणी नगरपंचायतीसाठी मंगळवारी (ता.२१) झालेल्या मतदानात ६०७९ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.यांची टक्केवारी ७१.५५% इतकी आहे.तर तीन ग्रामपंचायतीच्या ७९५ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे.
देवणी नगरपंचायतच्या १३ प्रभागासाठी १३ बुथवर मतदान झाले. एकूण ८४९७ मतदारापैकी ६०७९ मतदारानी हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी ७१.५५ इतकी झाले आहे.
सकाळच्या सत्रात थंडी जाणवत असल्याने मतदाराची संख्या कमी होती.सकाळी ११.३० वाजेपर्यत केवळ २९.७६% मतदान झाले पण दुपारनंतर प्रत्येक बुथवर रांगा लागल्या होत्या.
ग्रामीण भागातील तीन ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ११.३० वाजेपर्यत ४१% टक्के मतदान झाले होते.दुपारनंतर मतदाराची आवक सुरुच राहिल्याने १०४९ मतदारापैकी ७९५ मतदारानी हक्क बजावला.यांची टक्केवारी ७५.९९% आहे. आसे
निवडणुक निर्णय अधिकारी शोभा जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार सुरेश घोळवे यांनी सांगितले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडली.कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.पोनि. गणेश सोंडारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची मतमोजणी बुधवारी (ता.२२) रोजी होणार आहे.तर नगरपंचायत मतदानाची मतमोजनी १९ जानेवारीला होणार आहे.
१३ प्रभागापैकी सर्वात जास्त मतदान प्रभाग ९ मध्ये ८०.३७% झाले .तर सर्वात कमी मतदार प्रभाग १६ मध्ये ६०.९९% तर प्रभाग १७ मध्ये असलेले अन्य (तृतीयपंथी ) असलेले १ मतदान झाल्याने याची टक्केवारी १००% झाली आहे.