देवणी नगर पंचायत समोर नगरसेवक अमित सुर्यवंशी यांचे उपोषणाचा तिसरा दिवस
देवणी-प्रतिनिधी
देवणी,नगर पंचायत देवणी येथे गेल्या तीन दिवसापासून विविध विषयांच्या मागणीसाठी नगरसेवक अमित उर्फ बंटी सुर्यवंशी हे न. प. देवणी घनकचरा व्यावस्थापना अंतर्गत संबंधित स्वामी एजन्सी चे चौकशी करून आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी व कंत्राटी स्वच्छता कामगार यांना देण्यात येणाऱ्या वेतनाबाबत देयक तपशील व पीएफ खाते रक्कम बाबत माहिती देण्यात यावी संबंधित कंत्राटाची एकूण रक्कम किती आहे याचा तपशील कंत्राटदार हे नगरपंचायत अंतर्गत कोणत्या अटी व शर्तीने काम करीत आहेत याचा तपशील मागण्यासाठी मागील तीन दिवसापासून उपोषण करत आहेत आजचा उपोषणाचा तिसरा दिवस असुन उपोषणास विलास वाघमारे वलांडीकर रिपाई अमर चातुरे वलांडीकर यांनी भेट देऊन पांठींबा दर्शवला व अधिकाऱ्यास विचारपूस करून उपोषणाची दखल घेण्याची विनंती करण्यात आली. नगरसेवक अमित उर्फ बंटी सुर्यवंशी यांचे लोकशाही मार्गाने उपोषण सुरू आहे .