देवणी पंचायत समिती समोर चार अक्टोंबर पासुन बेमुदत उपोषण चालू
देवणी तालुक्यातील बोळेगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार! पंचायत समीतीच्या पञाला केराची टोपली
देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील मौजे बोळेगाव येथील ज्ञानोबा बिरू म्हेत्रे व भगवान ज्ञानोबा म्हेत्रे यांनी पंचायत समिती देवणी येथे दिनांक 19.11.2020 रोजी बोळेगाव ग्रामपंचायत नमुना नंबर 8 ला नियम बाह्य नोंद झाल्याचे तक्रार पंचायत समिती देवणी कार्यालयास केली होती. चौकशी अधिकारी अहवाल व त्यांच्या युक्तिवाद व निष्कर्ष प्रमाणे,तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार पंचायत समीतीच्या अधिकाऱ्यांने दिनांक 19.11.2020 रोजी ग्रामपंचायत बोळेगाव येथे भेट देऊन चौकशी केली असता, ग्रामसेवक यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे,उपलब्ध असलेले अभिलेख तपासले असता,सर्वे नंबर 144 ग्रामपंचायत नमुना नंबर 8 सन 2016-17 च्या नोंदीतील मालमत्ता क्रमांक 244 ग्रामपंचायत नमुना नंबर 8 ला नोंद घेण्यासाठी ठोस पुरावे,रजिस्टर कागदपत्रे घेऊन करावयास पाहिजे होती परंतु तसे न करता, खरेदी खताचा व्यवहार पूर्ण न होता, ग्रामपंचायत मासिक बैठक न घेता, परस्पर नोंद केल्याचे निदर्शनास आणून दिले आहे,सदरील विषयी तात्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांच्या कार्यकाळात नोंद घेतली गेली असल्यामुळे, नियम बाह्य घेतलेली मिळकत क्रमांक 244 ची नोंद ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत मासिक बैठकीत ठेवून रद्द करण्याविषयी पंचायत समिती देवणी मार्फत, ग्रामपंचायतीस पत्र देण्यात आले आहे.
पंचायत समिती अधिकारी चौकशी अहवालानुसार, पंचायत समिती कार्यालय तर्फे बोळेगाव ग्रामपंचायतीस अनेक पत्रव्यवहार करण्यात आले.
पंचायत समिती कार्यालयाचे पत्र क्रमांक 1 दिनांक 19.3.2021,पंचायत समिती कार्यालयाचे पत्र क्रमांक 2 दिनांक 10.06.2021,पंचायत समिती कार्यालयाचे पत्र क्रमांक 3 दिनांक 18.6.2021,पंचायत समिती कार्यालयाचे पत्र क्रमांक 4 दिनांक 07.07.2021,अशी एकुण नऊ पञ पाठवुन पत्र सुद्धा बोळेगाव ग्रामपंचायत कुठलेही सबळ पुरावे न देता पंचायत समिती देवणी यांच्या आदेशाला वारंवार केराची टोपली दाखवून अवमान करीत आहेत सदरील नियमबाह्य ग्राम पंचायतला नोंद केलेला नमुना आठ रद्द करण्याच्या मागणीसाठी भगवान ज्ञानोबा म्हेञे यांनी चार आक्टोंबर पासुन देवणी पंचायत समिती समोर अमरण उपोषण चालू केले आहेत !