देवणी पोलिसाच्या वतीने गणेश मंडळाची शांतता बैठकीत एक गाव एक गणपती बसवण्याचा संकल्प करावे – उपविभागीय पोलिस अधिकारी नितीनजी कट्टेकर
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहरातील संगमेश्वर मंगल कार्यालयात देवणी तालुका गणेश मंडळाची शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नितीन कट्टेकर उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा, विष्णुकांत गुट्टे पोलीस निरीक्षक ,राहुल पत्रिके नायब तहसीलदार, अशोक कट्टेकर विस्तार अधिकारी, डॉ संजय घोरपडे, शेषराव मानकरी, रमेश कोतवाल, तालुक्यातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव व पोलीस कर्मचारी उपस्थित होते या वेळी मनोहर पटने रमेश मनसुरे , अंकुश माने, रेवन मळभागे , अटल धनुरे, किशोर निडवंचे ,महेश धनुरे तुकाराम पाटील, रमेश पाटील, शिवाभाऊ कांबळे, दिपक मळभागे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना नितीन कट्टेकर म्हणाले की गणेश उत्सावात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले सुत्रसंचालन मोठेराव यांनी केले आभार विष्णुकांत गुट्टे यांनी केले.