@देवणी पोलीस ठाण्यात कार्यरत सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कार्य कौतुकास्पद –सपोनि श्री माणिकराव डोके

@पोहेकॉ.विनायकराव कांबळे, गणेश पुजारी, देविदास किवंडे घोडके, शंकर पाटील यांच्या निरोप समारंभात सपोनि डोके यांचे भावपूर्ण उदगार!

@मानवी हक्क अभियान संघटना लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी पाच पोलीस कर्मचाऱ्यांची बदली झाल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला

देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणी: देवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.हे.कॉ. विनायकराव कांबळे, गणेश पुजारी, देविदास किवंडे घोडके, शंकर पाटील यांची प्रशासकीय बदली उदगीर येथे झाली असल्याने देवणी पोलीस ठाणे व देवणी तालुक्यातील नागरिक व सर्वच राजकीय वतीने भव्य असा निरोप समारंभ कार्यक्रम देवणी पोलीस ठाणे येथे घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवणी पोलीस स्थानकाचे सपोनि श्री माणिकराव डोके हे होते. पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना देवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सर्वच पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे कार्य कौतुकास्पद असून आपल्या कार्याची छाप आपल्या कर्तृत्वातुन त्यानी देवणीकरात ठेवली आहे.खरंच माझे पोलीस. कर्मचारीअधिकारी कायदा सुव्यस्था स्थापन करून लोकांचे रक्षण करणारे उत्तम कार्याचे शिलेदार असल्याचे भावपूर्ण उदगार देवणी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री माणिकराव डोके यांनी काढले डोके पुढे म्हणाले की नोकरी म्हंटल बदली,पदोन्नती, सेवानिवृती या प्रशासकीय प्रक्रियेतुन सर्वच कर्मचारी अधिकारी यांना परिक्रमा करावी लागते त्याचाच एक भाग म्हणून बदली प्रक्रिया पूर्ण करीत आहेत कोठेही गेले तरी आपले कार्य ते पूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पाडतील यात शंकाच नाही म्हणून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाच्या वतीने मन्सूरे राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने प्रा. डॉ अनिल इंगोले, अंकुश गायकवाड, काँग्रेस पक्षाच्या वतीने औदुंबर पांचाळ पँथरचे बालाजी बनसोडे यांनी पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी केलेल्या चांगल्या कामाचा आढावा घेतला या कार्यक्रमास वैजनाथ लुले, वसंत कांबळे,नरसिंग सूर्यवंशी सोमनाथ लुल्ले हुसेन शेख, संपादक गिरीधर गायकवाड प्रताप कोयले जाकीर बागवान, हसन शेख बालाजी सूर्यवंशी, स्वप्नील बावगे, मुळे,सह सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थितीत होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रकांत मोठेराव यांनी केले तर आभार सत्कारमुर्ती पो हे कॉ विनायकराव कांबळे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp